Ahmednagar Politics : हिटलर अन् मोदींमध्ये 'या' 23 गोष्टी कॉमन; पवारांच्या सभेपूर्वी नगरमध्ये लंकेंच्या पत्रकांनी खळबळ

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : 'जर्मन प्रजेला हिटलर समजेपर्यंत देश रसातळाला गेला होता. संविधान वाचवा ! देशाची लोकशाही टिकवा !, या वाक्याने पत्रकाचा शेवट करण्यात आला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्यात सामना होत आहे. लंकेंच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आज नगरमध्ये सभा घेत आहेत. त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने वाटप केलेल्या पत्रकांची चर्चा आहे. यातून जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कसे साधर्म्य आहे, असे पत्रक सभास्थळी वाटप करण्यात आले आहे.

भाजपकडून लोकसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी असल्याचे वारंवार ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाच धागा पकडत मोदींची हिटलरशी तुलना करणारे पत्रक नगरमध्ये पवारांच्या सभास्थळी वाटप करण्यात आले आहेत. 'माझा अॅडॉल्फ हिटलरविषयीचा अभ्यास व निरीक्षण' या आशयाच्या पत्रकात हिटलरसंबंधित 23 मुद्दे देण्यात आले आहेत.

'जर्मन प्रजेला हिटलर समजेपर्यंत देश रसातळाला गेला होता. संविधान वाचवा ! देशाची लोकशाही टिकवा !, या वाक्याने पत्रकाचा शेवट करण्यात आला आहे. यातून आघाडीने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ते पत्रक आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

काय आहेत पत्रकातील 23 मुद्दे?

  • हिटलरने लग्न केले नव्हते.

  • हिटलर एका देशातील विशिष्ट धर्मातील लोकांना शत्रू मानत असे.

  • हिटलरच्या समर्थकांना हिटलरवर केलेली टीका सहन व्हायची नाही.

  • हिटलर लहानपणी रंग विकण्याचे, चित्र काढण्याचे काम करायचा.

  • हिटलरनी प्रसारमाध्यमे ताब्यात ठेवली होती.

  • हिटलरने सर्व कामगार आणि इतर चळवळी मोडून काढल्या.

  • हिटलर आपल्याला विरोध करणाऱ्याला देशद्रोही ठरवत असे.

Narendra Modi
Sharad Pawar News : सत्ता त्यांची अन् हिशोब मला मागतात; शरद पवारांनी उडवली अमित शाहांची खिल्ली
  • साधा कार्यकर्ता म्हणून हिटलर नाझी पक्षात घुसला आणि नंतर ज्येष्ठांना डावलून सत्ता काबीज केली.

  • तो देशातील सर्व समस्या चुटकी सरशी सोडवण्याचे आश्वासन द्यायचा.

  • हिटलरने सत्तेत आल्यानंतर समस्यांकडे दुर्लक्ष केले आणि देशही बरबाद केला.

  • हिटलर प्रचारात 'God Times Will Com' म्हणजेच 'अच्छे दिन आयेंगे' असे सांगत असे.

  • पहिल्यांदा संसदेत प्रवेश केल्यावर तो खूप रडला होता.

  • हिटलरनी खोटं बोलून सत्ता मिळवली होती.

  • हिटलरला टापटीप राहायला, नटायला आवडायचे.

  • हिटलर खोटे बोलण्याच्या कलेमध्ये पटाईत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

  • हिटलर भाषणांमध्ये कायम मी - मी करायचा.

  • हिटलरला रेडिओवर भाषण द्यायची आवड होती.

  • हिटलरने कधीच पत्रकार परिषद घेतली नाही.

  • हिटलरचा त्याच्या मंत्रिमंडळावर विश्वास नव्हता.

  • आपल्या भाषणांमध्ये तो नेहमी 'फ्रेंड-फ्रेंड' म्हणजे 'मित्रो-मित्र-मित्रो' असे म्हणायचा.

  • त्याला फोटो काढून घ्यायला खूप आवडायचे.

  • हिटलर प्रत्येक निवडणुकीपूर्वी देशांच्या पारंपरिक शत्रू विरुद्ध कुरापती काढून युद्ध करायचा.

(Edited by Sunil Dhumal)

R

Narendra Modi
Ajit Pawar News : धाराशिवमध्ये अजित पवारांची मोठी खेळी; असं टाळलं नाराज नेत्याच्या बंडखोरीचं संकट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com