Shrirang Barne, Jyotiraditya Scindia Sarkarnama
पुणे

Shrirang Barne : श्रीरंग बारणेंचा प्रश्न हिंदीत; ज्योतिरादित्यांचं उत्तर मराठीत; लोकसभेत नेमकं काय घडलं ?

Jyotiraditya Scindia On Pune Airplane : मध्य प्रदेशच्या शिंदेंचा मराठी बाणा; मी मराठा माणूस, पुण्याचा विकास हा माझा संकल्प

उत्तम कुटे

Pune Political News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी पुण्यातील रखडलेला विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत त्यांनी हिंदीतून आपला प्रश्न मांडला. त्यांच्या या हिंदीतील प्रश्नाचे उत्तर केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क मराठीतून दिले. शिंदेंच्या मराठीतील उत्तरामुळे खासदार बारणेंसह, तर सभागृहही अवाक् झाले होते.

ज्योतिरादित्य शिंदेंचे (Jyotiraditya Scindia) घराणे हे मूळचे महाराष्ट्रातील आहे. पुण्याविषयी, तर त्यांना खूप प्रेम आहे. ते गुरुवारी पुन्हा दिसले. पुण्यासंदर्भात प्रश्न विचारला म्हणून त्यांनी खासदार बारणेंना धन्यवाद दिले. एवढेच नाही, तर पुण्याचा विकास हा माझा,आमचा संकल्प आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे होणाऱ्या या नव्या विमानतळासाठी राज्य सरकारने फक्त नवी जागा सुचवावी, पुढील कार्यवाही करतो, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यासाठी यापूर्वी सूचविलेल्या जागेला स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुणे (Pune) जिल्ह्यातील एकमेव लोहगाव येथील लष्करी विमानतळामुळे विमानांच्या उड्डाणांना काही निर्बंध आहेत. दुसरीकडे वाढत्या नागरिकीकरणामुळे दुसऱ्या विमानतळाची निकड आहे. त्याकरिता खेड तालुक्यात चाकण, चांदूस, सेझ अशा तीन जागा शोधण्यात आल्या होत्या. पण तेथील भौगौलिक परिस्थिती अनुकूल नसल्याने आणि इतर कारणामुळे हा संभाव्य विमानतळ तेथे होऊ शकला नाही. आता तो पुरंदर येथे करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण, तेथेही त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे तो तेथेच वा पुणे जिल्ह्यात अन्यत्र कोठे तयार करण्याचा सरकारचा विचार आहे, असा प्रश्न बारणेंनी विचारला होता.

लोकसभा अध्यक्ष आज हेडमास्टर झाले होते. थोडक्यात एका ओळीत सरळ प्रश्न विचारण्यास त्यांनी सांगितले. त्यानंतरही बारणेंनी (Shrirang Barne) थोडी प्रस्तावना सुरू करताच त्यांना अध्यक्षांनी रोखले. तसेच मंत्री शिंदे यांनाही उत्तर हो किंवा नाही असे द्या, असे सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात शिंदे हे पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनसच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळीच त्यांनी त्याचे उद्घाटन तीन आठवड्यांत करू असे सांगितले होते. त्याचा आज त्यांनी पुनरुच्चार केला. मी मराठी माणूस आहे, असे त्यांनी मराठीतून सांगताच बारणे आणि सभागृह बघत राहिले.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT