Kolhapur News : प्रभू श्रीराम मंदिराच्या निमंत्रणावरून इंडिया आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद उफाळला आहे. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे काँग्रेसने निमंत्रण नाकारल्यानंतर केंद्रीय हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. प्रभू श्रीराम हे काल्पनिक असल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसने 140 कोटी जनतेचा अपमान केला आहे. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार, अशा शब्दांत मंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्पयात्रेला विरोध होत असल्याचे दिसत असताना त्यावर मंत्री शिंदे यांनी, भारत संकल्पयात्रेचा रथ रोखणारे हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. ते सर्वसामान्य नागरिक नाहीत. 50 वर्षांत जे घडलं नाही. ते आता मोदी सरकारमध्ये घडतंय, म्हणून महाविकास आघाडीला खुजली सुटली असल्याचा टोला ज्योतिरादित्य शिंदे यांनी लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने त्यांची विचारधारा स्पष्ट केलेली आहे. काँग्रेस (Congress) रामाचे अस्तित्व असल्याचा पुरावा मागत आहे, तर इंडिया आघाडीमधला एक सहयोगी पक्ष सनातन धर्म नष्ट करा म्हणतो, ही यांची मानसिकता आहे. अयोध्या कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारून काँग्रेसने फक्त देशातील 140 कोटी जनतेचाच नाही, तर जगभरातील रामभक्तांचा अपमान केला. येत्या काळात जनता त्यांना धडा शिकवेल, इंडिया आघाडी म्हणजे घमंडिया गटबंधन आहे, अशा शब्दांत ज्योतिरादित्य शिंदे यांनी निशाणा साधला.
नाशिकच्या प्रभू श्री काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्याचबरोबर आपापल्या परिसरातील मंदिराची स्वच्छता करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्याचे अनुकरण करीत आज केंद्रीय हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कागलमधील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात हातात झाडू घेऊन साफसफाई केली. त्यांच्यासोबत भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(Edited By- Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.