Shrirang Barne, Sanjogh Waghere Sarkarnama
पुणे

Shrirang Barne News : श्रीरंग बारणेंनी प्रतिस्पर्धी संजोग वाघेरेंना अगदीच हलक्यात घेतलं; नेमकं काय म्हणाले?

Maval Lok Sabha Constituency : पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यामुळे ते मावळात प्रचारासाठी येणार नाहीत, असे बारणेंनी स्पष्ट केले.

Sunil Balasaheb Dhumal

Maval Political News : लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व मतदारसंघांतील प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही ठिकाणी उणी-दुणी काढत, इतिहास उगळत चिखलफेकही केली जात आहे. अशा वातावरणात मात्र मावळचे Maval खासदार श्रीरंग बारणेंना त्यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे, हेच माहिती नाही. मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माझ्यासमोर कोण उमेदवार आहे, हे मलाच माहीत नाही, असे बारणे म्हणाले. Shrirang Barne taunts Sanjog Waghere by avoid.

महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी महायुतीत काही जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे. तो सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार हे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे Sanjog Waghere उमेदवार आहेत. प्रचारासाठी बारणे हे पिंपरी चिंचवडमध्ये होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वाघेरेंचे अस्तित्वतच नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, मला माझ्या समोरचा उमेदवार कोण आहे, हे सध्या तरी माहीत नाही, असे म्हणत बारणेंनी वाघेरेंची दखलच घेतली नाही, असा सांगण्याचा प्रयत्न केला.

या वेळी त्यांनी मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत जाहीर विधान करणेही टाळले. पवना बंदिस्त पाइपलाइनचा विषय हा भावनिक असल्याने मी या विषयात हात घालणार नाही. तसेच इतरांनीही या विषयाचे राजकारण करू नये, असे आवाहन श्रीरंग बारणेंनी Shrirang Barne केले आहे. त्यासोबतच त्यांनी मावळ लोकसभा क्षेत्रातील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी अजब वक्तव्य केले. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा फक्त माझ्या मतदारसंघातूनच नाही तर, आपल्या देशातूनही गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, महायुतीचा धर्म म्हणून बारणेंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारणेंच्या प्रचारासाठी उतरले आहेत. बारणेंनी मात्र गतवेळचे विरोधी उमेदवार पार्थ पवारांना Parth Pawar प्रचारासाठी यावे, असे आवाहन केलेले आहेत. पार्थ पवार मात्र त्यांची आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती Baramati लोकसभा मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यामुळे पार्थ पवार आता माझ्या प्रचाराला येणार नाहीत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT