शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर महायुतीकडून व्यक्तिगत पातळीवर टीका करून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधी खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि आता खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी हल्लाबोल केला होता. 'नटसम्राट' म्हणत अजित पवारांनी कोल्हेंवर टीकास्र डागलं होतं.
अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) टीकेला खासदार कोल्हे ( Amol Kolhe ) यांनीही प्रत्युत्तर दिलं. ट्विट करत कोल्हे म्हणाले, "कार्यसम्राट की नटसम्राट माहिती नाही. पण, स्वकर्तृत्वसम्राट नक्की! 2001 मध्ये “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही, तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर.. आणि योगायोगाने आज 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो, ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) अमोल कोल्हेंची पाठराखण करत सुसंस्कृत राजकीय नेतृत्व असल्याचं सांगितलं. "अमोल कोल्हेंचं संसदेतील काम सर्वोत्तम आहे. मतदारसंघातही खूप विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे खासदार कोल्हे यांच्यावर कोणी काय बोलावं, हा ज्याचा प्रश्न आहे. ही लोकशाही आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, समोरून कितीही राजकारणाचा स्तर घसरला तरीही आपण व्यक्तिगत पातळीवर टीका करायची नाही. अशा स्पष्ट सूचना खासदार कोल्हेंनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकारणात एक सुसंस्कृतपणा जपण्याचे आवाहनदेखील खासदार कोल्हेंनी केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
"आताच्या खासदाराने मतदारसंघात किती संपर्क ठेवला, त्यांनी किती कार्यक्रमांना उपस्थिती लावली, लोकांसाठी ते किती उपलब्ध होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला नटसम्राट खासदार हवा की कार्यसम्राट खासदार हवा," असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी कोल्हेंवर निशाणा साधला होता.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.