SIR News : भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली असून, त्यानुसार महाराष्ट्रासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानुसार गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, दावे व हरकतींचा निपटारा १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. गणना प्रपत्र म्हणजे निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी, सुधारण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा अधिकृत फॉर्म आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने १८ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
सुधारित कार्यक्रमानुसार गणना प्रपत्रे तयार करणे व मुद्रित करण्याची कार्यवाही १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येईल. प्राप्त गणना प्रपत्रांची निकाली काढण्याची कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मतदार यादी पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात नोटीस देणे तसेच दावे व हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
मोबाईल फोनवर व्हॉट्सॲपची सुविधा असलेल्या मतदारांना भरलेले गणना प्रपत्र व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित मतदारांना स्वतंत्र अर्जाद्वारे प्रपत्र देण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी तसेच या कार्यक्रमाची राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.