Maharashtra SIR: महाराष्ट्रात SIR प्रक्रियेत नोटीस पाठवलेली ९९ टक्क्यांहून अधिक नावं पुन्हा यादीत होणार समाविष्ट

Maharashtra SIR: महाराष्ट्रात पार पडलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेंतर्गत (SIR) तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ इतक्या मतदारांची नावं वगळण्यात आली होती. यांपैकी सुमारे दीड कोटी पात्र मतदारांना तार्किक विसंगतीमुळं नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या.
Maharashtra SIR Voter List
Maharashtra SIR Voter ListSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra SIR: महाराष्ट्रात पार पडलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेंतर्गत (SIR) तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ इतक्या मतदारांची नावं वगळण्यात आली होती. या मतदारांकडून एसआयआरच्या प्रक्रियेत गैरहजेरी, स्थलांतरीत, मृत, इतरत्र नोंदणी केल्यानं याद्यांमधून नावं वगळण्यात आली होती. यांपैकी १,२२,२४,००७ पात्र मतदारांना पण तार्किक विसंगतीमुळं नावं समाविष्ट होऊ न शकलेल्यांना नोटीसा पाठवून पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, या वगळलेल्या नावांपैकी ९९.९४ टक्के व्यक्तींनी याची पूर्तता केल्यानं त्यांची नावं पुन्हा याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

Maharashtra SIR Voter List
Kareena Kapoor: करीना कपूरच्या पेंडंटवरुन पेटलं राजकारण! काँग्रेसच्या नेत्याचा आक्षेप, अभिनेत्रीला थेट नोटीसच धाडली

एसआयआर प्रक्रियेनंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यामध्ये SIR पूर्वी महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यापैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ अर्थात ७८.८६ टक्के मतदारांचा प्रारुप यादीत समाविष्ट झाला होता. तर २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ अर्थात २१.१४ टक्के मतदारांचा प्रारुप यादीत समावेश होऊ शकला नव्हता. एसआयआरचा फॉर्म भरुन न दिल्यानं गैरहजेरी, स्थलांतरीत, मृत, इतरत्र नोंदणी केल्यानं या कारणांमुळं ही नावं याद्यांमधून वगळण्यात आली होती. अशा मतदारांना ASDD (अब्सेंट, शिफ्टेड, डेड, डुप्लिकेट) यादीत टाकण्यात आलं होतं.

दरम्यान, प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्रासह फॉर्म क्रं. ६ भरुन नव्यान नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आलं होतं. पण यावरुन मोठा गदारोळ झाला होता. कारण फॉर्म ६ मध्ये 'आमचं यापूर्वी मतदार यादीत नाव नव्हतं' असं शपथेवर सांगावं लागणार होतं. पण आधीच मतदार यादीत नाव असताना आणि मतदान केलेलं असताना असं प्रतिज्ञापत्र सादर करणं हे शपथेवर खोटं बोलण्यासारखं असल्यानं हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जुन्या मतदारांसाठी फॉर्म ६ सोबत प्रतिज्ञापत्राची अट काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

Maharashtra SIR Voter List
UP Election 2027: युपीत नवं सत्तासमीकरण! चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; भाजप, सपामध्ये खळबळ

पण यांपैकी १,२२,२४,००७ मतदारांची यापूर्वीच्या २००२च्या SIR प्रक्रियेवेळच्या यादीत नाव असल्याचं स्पष्ट झालं होतं पण तरीही चुकीचं नाव, पत्ते याबाबत विसंगती आढळून आल्यानं त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यासाठी त्यांना पुन्हा ओळख पटवण्यासाठी दहावीचं प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट यांपैकी कुठलंही एक कागदपत्र सादर करावं लागलं होतं. याची पुर्तता त्यांनी केल्यामुळं त्यांचा आता ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट होणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं मुंबई शहर आणइ उपनगर, ठाणे, नाशिक, नंदूरबार सातारा, सोलापूर, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमधील प्रारुप यादीत नाव न आलेल्या ९९ टक्क्यांहून अधिक मतदारांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर देऊन योग्य कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळं त्यांची नावं कायम राहणार आहेत.

आज शेवटची संधी

दरम्यान, महाराष्ट्रात अद्यापही ज्या मतदारांचं SIR च्या प्रारूप मतदार यादीत नाव नाही, त्या मतदारांना अंतिम यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपत आहे. दाखल दावे आणि हरकतींवर २५ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार असून, ३० नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.