Pune, 04 August : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोयना धरण क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे.
धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून आज दिवसभरामध्ये जास्तीचं पाणी सोडण्यात यावं. धरण 35 टक्के खाली करून 65 टक्केच भरलेलं राहील, याची काळजी घ्यावी.
खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सध्या 27 हजार 16 क्युसेक, मुळशी धरणातून 27 हजार 609 क्युसेक, पवना धरणातून 5 हजार क्युसेक, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांत धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अजितदादा आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेऊन नागरिकांना तशा सूचना द्याव्यात, तसेच नागरिकांना पाण्याच्या विसर्गाबद्दल माहिती व्हावी, या अनुषंगाने विविध माध्यमातून माहिती देऊन सतर्क राहण्याबाबत कळवण्याच्या सूचनाही या वेळी अजितदादांनी दिल्या.
अजितदादा म्हणाले, धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शंभर टक्के पाणी वाढणार आहे. रविवार असल्याने अधिकची काळजी घेणे आवश्यक आहे. खडकवासला धरणातून आज दिवसभरामध्ये जास्तीचं पाणी सोडण्यात यावं. धरण 35 टक्के खाली करून 65 टक्केच भरलेलं राहील, याची काळजी घ्यावी.
जेणेकरून रात्री जोरदार पाऊस आला तरी पस्तीस टक्के धरण रिकामं असल्यास ते भरलं जाईल आणि रात्री जास्तीचे पाणी सोडण्याची वेळ येणार नाही. दिवसभरामध्ये पाणी सोडण्याबाबतच्या पूर्व सूचना ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून, संदेशाच्या माध्यमातून लोकांना द्याव्यात. तसेच, सर्व घडामोडींबाबत माझ्यासोबत संपर्कात राहा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.