Babandada Shinde : अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनी मुलासह घेतली शरद पवारांची भेट; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

Babanrao Shinde & His son Meet Sharad Pawar : अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आमदार शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Sharad Pawar- Babanrao Shinde-Ranjitshinh Shinde
Sharad Pawar- Babanrao Shinde-Ranjitshinh ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज (ता. 04 ऑगस्ट) पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

आमदार शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे होते. अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आमदार शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले गेलेल्या बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी अचानक शरद पवार यांची पुण्यातील त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थान जाऊन भेट घेतली. इंदापूरनंतर माढ्यातही शरद पवार (Sharad Pawar) हे अजित पवार यांना धक्का देणार अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे आमदार बबनराव शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हेही उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हेही निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माढ्यात मोठी चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar- Babanrao Shinde-Ranjitshinh Shinde
Manoj Jarange Patil : फडणवीस अन्‌ भाजप नेत्यांवर बोलाल तर आम्हीही उत्तर देणार; नारायण राणेंचा जरांगे पाटलांना इशारा

शरद पवार यांच्या माध्यमातून आमदार बबनराव शिंदे हे आपल्या मुलाची विधानसभेची वाट सोपी करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशी चर्चा या भेटीमुळे रंगली आहे. आता बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी शरद पवार यांची भेट घेतली, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन सुप्रिया सुळे यांची भेट घेतली हेाती. त्यावेळीही आगामी निवडणुकीत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू रमेश शिंदे या दोघांमध्ये राजकीय संघर्ष होणार असल्याची चर्चा रंगली हेाती.

Sharad Pawar- Babanrao Shinde-Ranjitshinh Shinde
Dilip Mane : प्रणिती शिंदेंनी दिलीप मानेंचे कौतुक करताच सुरेश हसापुरे व्यासपीठावरून उठून गेले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com