Dilip Walse Patil  Sarkarnama
पुणे

Dilip Walse Patil News : ''...म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी थेट खुर्चीच सोडली !

NCP Political News : मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यात प्रथमच आले होते.

सरकारनामा ब्यूरो

सुदाम बिडकर

Ambegaon : महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या दिलीप वळसे पाटलांकडे शिंदे- फडणवीस -पवार सरकारमध्ये सहकार खात्याच्या मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली आहे. संयमी आणि अभ्यासू ओळख असलेल्या वळसे पाटलांनी भेटण्यासाठी आलेल्या आणि बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या भेटीसाठी थेट खुर्ची सोडली आणि नागरिकांच्या गर्दीत जाऊन त्यांची भेट घेतली. वळसे पाटलांच्या या कृतीने उपस्थित सर्वचजण भारावून गेले.

राज्याच्या मंत्री मंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यात प्रथमच आले होते. नागरिकांना भेटण्यासाठी ते पारगाव येथील भीमाशंकर(Bhimashankar) सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात थांबले होते. यावेळी संपूर्ण आंबेगाव तालुका तसेच शिरूर तालुक्यातील असंख्य नागरिक तसेच कार्यकर्ते आपल्या कामांची निवेदन घेऊन वळसे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते तर काहीजण वळसे पाटील यांची सहकारमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी आले होते.

सर्वसामान्य नागरिकांना आपल्या भेटीसाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. त्या गर्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्याचे समजताच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) हे स्वत : खुर्चीवरून उठून नागरिकांमध्ये येऊन उभे राहिले. त्यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊ लागल्याने उपस्थित सगळेजण आपला नेता आपल्यातच येऊन उभा राहिल्याचे पाहून भारावून गेले.(Latest Marathi News)

वळसे पाटील कार्यालयात बसून प्रत्येक नागरिकांचे व भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे समजावून घेऊन जे काम फोनवर होत असेल तर लगेच स्वीय सहाय्यकाला संबधिताला फोन लावून लगेच प्रश्न मार्गी लावत होते तर काहींना पत्राची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी लगेच पत्र या वळसे पाटलांच्या वेगवान कामाच्या शैलीमुळे कृतीने भारावून गेले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT