Shinde Group MLA On Uddhav Thackeray : '' आम्ही खेकडे नाही, तर 50 वाघ...''; शिंदे गटाच्या आमदारांची 'डरकाळी'

Shivsena Political News : '' आम्हाला डालडाचा डबा म्हणू द्या नाहीतर खेकडे...''
Eknath Shinde - Uddhav Thackeray
Eknath Shinde - Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेने( उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीनंतरच्या आरोप - प्रत्यारोपांच्या धुमाळीत शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून अर्थात, ठाकरे - शिंदे गटाच्या वर्तुळातून डरकाळ्या फोडल्या जात आहेत. ठाकरेंची मुलाखत पाहत नाही , ऐकत नाही असे सांगत शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या स्टाईलनेच ठाकरेंवर पलटवार केला आहे. आम्ही खेकडे नाही, तर ५० वाघ आहोत आणि म्हणूनच उठाव केला असं निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक मुलाखतीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीतून ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे. या मुलाखतीत ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना थेट खेकड्यांची उपमा देत माझं सरकार वाहून नाही गेलं, तर खेकड्यांनी धरण फोडलं अशी बोचरी टीका केली आहे. आता ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आम्ही खेकडे नाही तर वाघ आहोत असं प्रत्युत्तर दिले आहे.

Eknath Shinde - Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Interview : '...तर असा समान नागरी कायदा होऊ शकत नाही' ; उद्धव ठाकरेंचे रोखठोक मत!

शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड( Sanjay Gaikwad) यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. गायकवाड म्हणाले, आम्ही खेकडे नाही. तर 50 वाघ आहोत. त्याचमुळे आम्ही उठाव केला आणि बाहेर पडलो. त्यांनी कितीही दुषणं लावली तरीदेखील काही फरक पडत नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगितलं घरी बसू नका. बाहेर पडा. घरी बसून सरकार चालत नाही. पण त्यांनी ऐकलं नाही. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण त्यांच्या आजूबाजूला सगळे लोंबते आहेत असा बोचरा पलटवारही त्यांनी केला.

शिरसाटांचा खोचक टोला....

आमदार संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)च्या मुलाखतीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, त्यांना वाटतं आम्ही डालड्याचा डब्बा आहे तर डब्यातील डालडा काढा आणि पुरी तळा. त्या पुऱ्या खा. आणखी काय बोलणार उद्धव ठाकरेंना…, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. खेकडे म्हणा , गद्दार म्हणा आणखी काय म्हणायचं ते म्हणा… पण आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.

Eknath Shinde - Uddhav Thackeray
No Motion Confidence : अविश्वास प्रस्तावाने वाढवली मोदी सरकारची धडधड; काय सांगतात लोकसभेतील आकडे ?

'' त्यांनी आम्हांला डालडाचा डबा म्हणू द्या. नाहीतर खेकडे...''

शिंदे गटात प्रवेश केलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदें(Manisha Kayande)नीही ठाकरेंच्या टीकेवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना बोलू द्या. आम्हांला काही फरक पडत नाही. आम्ही विकासाचं राजकारण करून त्यांना उत्तर देऊ. जनता आमच्यासोबत आहे. बरेच शिवसैनिक आमच्या संपर्कात आहेत असं कायंदे म्हणाल्या आहेत.

Eknath Shinde - Uddhav Thackeray
Raj Thackeray On NCP: मोदींनी 70 हजार कोटींचा आरोप केलेल्या राष्ट्रवादीशीच भाजपची युती; राज ठाकरेंनी वर्मावर ठेवलं बोट

डालडाचा डबा म्हणू द्या. आम्हाला खेकडे म्हणू द्या. काही दुषणं देऊ द्या. काही फरक पडत नाही. त्या एकेकाळी आम्ही त्यांच्यासोबत राहायलो. त्यामुळे आम्ही त्यांचं आदर करतो. पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे घेऊन चाललो आहोत. त्या विचारधारेवर आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही असेही कायंदेंनी म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com