Sushma Andhare News
Sushma Andhare News Sarkarnama
पुणे

Sushma Andhare News : ''...तर मग शिरसाटांना 'क्लिनचीट' कशी दिली?''; अंधारेंचा फडणवीसांना संतप्त सवाल

सरकारनामा ब्यूरो

Pune : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंविषयी एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याविरोधात अंधारेंनी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शिरसाट यांना क्लिनचीट दिली आहे. यावरुन आता सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आज(दि.२) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिरसाटांवर टीकेची झोड उठवतानाच थेट देवेंद्र फडणवीसांनाही काही सवाल केले आहेत. अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस एक संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. ते गृहमंत्री म्हणून सरकारची बाजू घेतील. पण मी वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते आहे.

मला कुठलीच माहिती न देता, माझी बाजू ऐकून न घेताच हे प्रकरण निकाली कसं काढलं? गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. फडणवीसांनी वकील म्हणून उत्तरं द्यावीत असं अंधारे म्हणाल्या.

मी असभ्य लोकांशी बोलत नाही...

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रकरणात त्या आमदाराने क्लिनचीट दिली असल्याचं सांगितलंय. मी असभ्य लोकांशी बोलत नाही. पण देवेंद्रजी, तुम्ही एक अभ्यासू आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतेय. ही क्लिनचीट कशी दिली गेली. याबाबत खुलासा करावा असंही अंधारे म्हणाल्या.

संजय शिरसाट काय म्हणाले होते ?

सुषमा अंधारे तपास समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्या पत्रकार परिषदेत रडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्या चांगल्या अॅक्टर आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा अहवाल कोर्टात जाईल, तेव्हा त्यांनी बाजू मांडावी असं शिरसाट म्हणाले होते. तसेच मी वारंवार सांगितलं होतं, मी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नव्हतं. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांनी समजावं अशी प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT