Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule On Sanjay Shirsat : ''...म्हणून शिरसाट यांना सरकार पाठीशी घालतंय का?''; सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

सरकारनामा ब्यूरो

Pune News : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच अंधारे यांनी देखील शिरसाटांच्या वक्तव्याविरोधात महिला आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पण अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच मुद्द्यावरुन शिदे फडणवीस सरकारला फटकारलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सुळे म्हणाल्या,"छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत.

संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे असंही सुळे म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी टि्वट केलं आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेंशन केलं आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईमच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचं आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल असंही सुळे यांनी यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंविषयी उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो अशी टिप्पणीही सुळे यांनी केली.

त्यातही बेताल वक्तव्यं करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी असंही खासदार सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT