Udayanraje Bhosle, Murlidhar Mohol
Udayanraje Bhosle, Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Modi Cabinet 3.0 : ...म्हणून मोहोळ यांना मंत्रिपदी संधी दिली अन् उदयनराजेंना डावललं!

उत्तम कुटे 

Pune News, 11 June : नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि भाजपप्रणीत एनडीएसरकारची स्थापन केलं. मोदींच्या या सरकारमध्ये 72 मंत्री आहेत. या जंबो मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील 6 खासदारांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र, या सहा जणांपैकी सर्वात जास्त चर्चा आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची, कारण ते प्रथमच खासदार झाले आणि त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. पण मोहोळ नवखे असतानाही केवळ पवारांच्या पुणे जिल्हा या बालेकिल्याला सरुंग लावण्यासाठी मोदी-शहांनी हा डाव टाकल्याचं बोललं जात आहे.

पण मोहोळ नवखे असतानाही केवळ पवारांच्या पुणे जिल्हा या बालेकिल्याला सरुंग लावण्यासाठी मोदी-शहांनी हा डाव टाकल्याचं बोललं जात आहे. साताऱ्यातून 3 वेळा निवडून आलेले उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना डावलून पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ यांना मंत्री केली. त्यामुळे या मंत्रि‍पदाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय अमित शहांकडे असलेल्या सहकार खाते या अत्यंत महत्वाच्या खात्याचे त्यांना राज्यमंत्रिपद दिल्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

कारण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रावर चांगली पकड आहे. त्यामुळेच या टर्मला मोदी सरकारने केंद्रात सहकार मंत्रालय तयार केलं. अमित शहांनी ते स्वत:कडेच ठेवले. या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सहकार अत्यंत मजबूत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील खासदाराकडे देऊन दोन्ही काँग्रेसला शह देण्याची खेळी भाजपने (BJP) केली.

केवळ मोहोळच नव्हे तर अत्यंत विचारपूर्वक संपूर्ण मंत्रीमंडळ मोदी-शहांनी यावेळी तयार केलं आहे. 4 महिन्यानंतरची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक त्यासाठी डोळ्यांसमोर ठेवण्यात आली आहे. त्यानुसार मोहोळांना दिलेले सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद हे गेमचेंजर ठरण्याची शक्यता असल्याचं भाजपला वाटत आहे.

म्हणूनच त्यांनी अनुभवी उदयनराजेंऐवजी नवख्या मोहोळांना मंत्रि‍पदाची संधी दिली. लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतांचा मोठा फटका भाजपसह महायुतीला महाराष्ट्रात बसला. ही मते आघाडीच्या पारड्यात गेली. त्यामुळे ते वरचढ ठरले. ही मते विधानसभेला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी एकही खासदार नसलेल्या रामदास आठवलेंना पुन्हा भाजपने मंत्री केलं आहे. तसेच ओबीसी मंत्रीही वाढवले आहेत.

महाराष्ट्र हे सहकाराचे राज्य आहे. राज्यात विविध सहकारी कार्यकारी सोसायट्या, दुग्ध व्यवसाय, सहकारी पतसंस्था, बँका आणि सर्वात महत्त्वाचे साखर कारखान्यांतून दोन्ही काँग्रेसने ग्रामीण भागांवर आपली पकड निर्माण केली आहे. शहरी भागात भाजपचं वर्चस्व आहे. मात्र,सहकारामुळे ग्रामीण भागात त्यांना आपले बस्तान अजून पूर्णपणे बसविण्यात यश आलेलं नाही. ते बसविण्यासाठीच मोहोळांना सहकाराचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

कारण शहा यांना देशात लक्ष घालायचे असल्याने महाराष्ट्रातील सहकारासाठी त्यांनी मोहोळांची निवड केली आहे. सहकारानेच लोकसभेला महायुतीला ग्रामीण महाराष्ट्राने इंगा दाखवल्याने लगेच तेथे हे डॅमेज कंट्रोल भाजपने सुरु केलं आहे. राज्यातील बहूतांश सहकारी साखर कारखाने काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्याच्याच जोरावर त्यांच्या नेत्यांची राजकीय कारकिर्द सुरु आहे. तिलाच सुरुंग लावण्यााचा हा डाव आहे.

यासाठी आजारी कारखान्यांना पुन्हा नव्याने सुरु करण्यात येणार आहेत. शिवाय तेथील काँग्रेसच्या नेत्यांनाही भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. त्याचा आगामी विधानसभेला राज्यात फायदा होऊ शकतो, असं भाजपचं गणित आहे. त्यामुळेच मोहोळांना सहकार खाते देण्यात आले आहे.

शिवाय नागरी उड्डाण या महत्वाच्या मंत्रालयाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली गेली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे रखडलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती देण्याचा त्यांचा विचार आहे. कारण त्याचेही भांडवल नंतर भाजप करु शकत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT