Pandharpur crime News: आपल्या काही साथीदारांच्या मदतीने एका नगरसेवकाने तीन जणांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. विद्यमान नगरसेवकाने हा हल्ला केल्याने पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण कुठल्या दिशेनं चाललं आहे, असा प्रश्न सामन्य नागरिकांना पडला आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर पंढरपुरात खळबळ उडाली आहे.
एका नगरसेवकाकडूनच अशा प्रकाराचा गंभीर हल्ला झाल्याने पंढरपुराचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूर पोलिसांनी या प्रकरणी नगरसेवकांसह तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश यादव असे या नगरसेवकाचे नाव आहे. त्याने तीन जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकेश यादव याच्यासह माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह २० जणांवर पंढरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.लोकेश यादव हा भालके गटाच्या 'तीर्थक्षेत्र विकास आघाडी'चा विद्यमान नगरसेवक आहे. पीडित व्यक्तींनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पीडित व्यक्तींकडे काही दिवसांपासून आरोपी नगरसेवक लोकेश यादव आणि त्याचे साथीदार वारंवार 'भिशी' लावण्याचा तगादा लावत होते. पण संबंधित तिघांनी भिशी लावण्यास नकार दिला होता, त्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून लोकेश यादव आणि नागेश यादव यांनी आपल्या साथीदारांसह मिळून या तिघांवर कोयत्याने हल्ला केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.