Pune District Bank News: वळसे पाटील, भरणेमामा, थोपटे, दिलीप मोहिते निवडणूक लढण्यास अपात्र; नव्या कायद्याचा दणका

Maharashtra Govt New Rule for Cooperative Bank Directors: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
Maharashtra Govt New Rule for Cooperative Bank Directors election rules.
Maharashtra Govt New Rule for Cooperative Bank Directorssarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cooperative Bank Rule For Election: जिल्ह्यात अनेकांची राजकीय कारकीर्द ही सहकारात अग्रभागी असलेल्या पुणे जिल्हा बँकेतून झाली आहे.जिल्हा बँकेची सत्ता अनेक वर्ष ताब्यात ठेवणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना सहकार कायद्याच्या नव्या नियमाचा फटका बसला आहे. सहकारसम्राटांवर गंडांतर आले आहे.नव्या कायद्याने जिल्हा बँकेत वर्षानुवर्ष सत्ता भोगणाऱ्या बड्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

बँकेला प्रगतिपथावर नेणान्या ज्येष्ठ संचालकांना सत्तेतून बाहेर व्हावे लागणार आहे.बैंकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ ची अंमलबजावणीचे आदेश सरकारने दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये १० वर्षांहून अधिक काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिला आहे.

जिल्हा बँकेवर दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ संचालक म्हणून कारकीर्द राहिलेले संचालक नव्या बँकिंग सुधारणा अधिनियमाच्या अंमलबजावणीमुळे अडचणीत आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक सहकारी बँकांमधील दीर्घकाळ सत्तेत असलेल्या संचालकांचे धाबे दणाणले आहे. आता त्यांना जिल्हा बॅँकेत नवा चेहरा द्यावा लागणार आहे.

Maharashtra Govt New Rule for Cooperative Bank Directors election rules.
Maval APMC Election: राष्ट्रवादीला धक्का!बहुमत असूनही मते फुटली; मावळ बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव

त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ संचालकांचा समावेश आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, आमदार व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार व बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, माजी आमदार संग््रााम थोपटे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, रेवणनाथ दारवटकर, ॲड संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे यांचा समावेश आहे.

Maharashtra Govt New Rule for Cooperative Bank Directors election rules.
District Bank News: प्रस्थापित बड्या नेत्यांचे जिल्हा बँकेतील 'अकाउंट क्लोज'; नव्या कायद्याने दाखवला घरचा रस्ता

राजकीय समीकरणे बदलणार

नव्या नियमामुळे बँकांच्या संचालक मंडळात दिग्गजांचे प्रस्थ संपुष्टात आले आहे. यामुळे बँकांच्या आगामी निवडणुकांवेळीही राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ग्रामीण परिसरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर प्रस्थापित संचालकांच्या जागी नव्या चेहन्यांना संधी मिळणार आहे.

Maharashtra Govt New Rule for Cooperative Bank Directors election rules.
Chandrakant Patil News: प्राध्यापक भरती कधी होणार? चंद्रकांतदादांनी सांगितली तारीख

9 संचालक तत्काळ अपात्र

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षकि निवडणूक होऊन 4 जानेवारी 2022 पासून विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे.जानेवारीत बँकेची पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत प्राधिकरणाकडूनही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही ही निवडणूक प्रक्रिया राबविताना करावी, असे कळवले आहे.

त्यामुळे ही प्रक्रिया तशी सुरू झालेली असल्याचे प्राधिकरणाने दिलेल्या 16 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे बँकिंग सुधारणा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सहकार मंत्रालयाने सहकार आयुक्तालयास 9 मार्च 2026 रोजी पाठवलेल्या पत्राची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवरील किमान 9 संचालक तत्काळ अपात्र ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com