पुणे : भाजप नते किरीट सोमय्या पुणे (pune) महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले आहेत. मात्र या दौऱ्यात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कारसमोर लोटांगण घालत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक (Shivsena) चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांवर सौम्य लाठीचार्ज करत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.
या झटापटीत किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. याच दरम्यान त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसैनिकांवर निशाणा साधला आहे. 'पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला.'' असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषदही घेणार होते.मात्र किरीट सोमय्या महापालिकेत पोहचताच तिथे आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची गाडी अडवली. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कारसमोर लोटांगण घालत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक (Shivsena) चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.