शिवसैनिकांशी झटापट; किरीट सोमय्या पळता पळता पडले

भाजप नते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले आहेत.
शिवसैनिकांशी झटापट; किरीट सोमय्या पळता पळता पडले
Published on
Updated on

पुणे : भाजप नते किरीट सोमय्या पुणे (pune) महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषदही घेणार होते.

मात्र या दौऱ्यात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या महापालिकेत पोहचताच तिथे आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची गाडी अडवली. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कारसमोर लोटांगण घालत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक (Shivsena) चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

शिवसैनिकांशी झटापट; किरीट सोमय्या पळता पळता पडले
लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली, डॉ. म्हणाले...

शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्यां अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांवर सौम्य लाठीचार्ज करत सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.

किरीट सोमय्यांचे आरोप

लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट देण्यात आलं होतं. कोरोना काळात कोविड सेंटर सुरू असताना अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांच्या मृत्यूला हॉस्पिटलचे व्यवस्थापन कारणीभूत आहे. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले. सुजित पाटकर यांची ही कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाल्याचे दिसत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com