Pradeep Gartkar Sarkarnama
पुणे

Pune Market Committee Election : महाआघाडीचे काही कार्यकर्ते विरोधकांना मिळाले अन्‌ राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाने दिली ताकीद...

उद्या उमेदवारी मिळाली नाही; म्हणून कोणीही नाराज होऊ नका. तसेच, त्या नाराजीचा फायदा विरोधकांना होऊ देऊ नका.

कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द (जि. पुणे) : काही तरी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) काही कार्यकर्ते विरोधकांना मिळाले आहेत. आपला अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल हा भ्रष्टाचार मुक्त पॅनेल असेल. आपण सर्वजण आता एकदिलाने काम करीत आहोत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. उद्या उमेदवारी मिळाली नाही; म्हणून कोणीही नाराज होऊ नका. तसेच, त्या नाराजीचा फायदा विरोधकांना होऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. (Some activists of Mahavikas Aghadi have gone to the opposition : Pradeep Gartkar)

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलच्या प्रचारासाठी शेवाळेवाडी येथे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या निवास स्थानी प्रांगणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गारटकर बोलत होते.

गारटकर म्हणाले, "आमची आखणी पूर्ण झाली आहे. प्रत्येक जागेसाठी आम्ही दोन उमेदवार निवडले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यातील एकाचे नाव निश्चित करण्यात येईल. जाहीरनामा तयार आहे. माघारीच्या वीस तारखेनंतर चिन्हासह प्रचार सुरू करू. उमेदवारीबाबत अजितदादांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. '

गद्दारांना आताच हुसकावून लावा

या बैठकीत काही इच्छुक असे आहेत की ते उमेदवारी न मिळाल्यास विरोधकांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत, अशी दबक्या आवाजातील चर्चा ऐकायला येत होती. असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आताच पक्षातून हूसकावून लावले पाहिजे, अशी मागणीही काही निष्ठावंतांकडून होत होती.

अजितदादा न आल्याने इच्छूक नाराज

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार या बैठकीसाठी येणार होते. त्यादृष्टीने सगळी तयारीही झाली होती. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. पॅनेलचे उमेदवार आज निश्चितपणे जाहीर होतील किंवा त्याबाबत विशेष चर्चा तरी होईल, अशी सर्वांना खात्री होती. मात्र, अजितदादा काल पुण्यातील दुपारनंतरचे सर्व कार्यक्रम रद्द करून नॉटरिचेबल झाल्याने उमेदवारीचा मुहूर्त पुढे गेल्याची निराशा इच्छुकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT