मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळेवढा (Mangalveda) कृषी उत्पन्न बाजार समितीची (Bazar Samiti) निवडणूक (Election) ही तालुक्याच्या भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याने या निवडणुकीत समविचारी आघाडीला रोखण्यासाठी आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade) आणि ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे हे दोन राजकीय नेते एकत्र येणार का? याची चर्चा जोर धरू लागली आहे. (Will uncle-nephews come together in Mangalvedha Bazar Samiti elections?)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मंगळवेढ्याच्या आवताडे परिवारामध्ये राजकीय संघर्षातून फूट पडली होती. त्यामुळे आमदार समाधान आवताडे आणि ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांचे तालुक्यात दोन गट पडले होते. त्यामुळे समर्थकांची मात्र गोची झाली होती. पोटनिवडणुकीनंतर झालेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समाधान आवताडे यांना रोखण्यासाठी बबनराव अवताडे यांच्या सहकार्याने आवताडे विरोधकांनी भालके-परिचारक गट आणि भाजपमधीलच आवताडे विरोधकांनी एकत्र आले होते. त्यात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे दोन राजकीय शत्रू एकत्र येऊन आवताडे यांच्या विरोधात दंड थोपटू लागले आहेत.
दामाजीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी समविचारीची बांधणी करणारे बबनराव अवताडे यांना बाजूला करत भालके-परिचारक समर्थकांनी एकत्र येऊन दामाजी कारखाना ताब्यात घेतला. राष्ट्रवादीने कारखान्यातील सत्तेसाठी परिचारक गटाला मदत केली. यापुढील सर्व निवडणुका समविचारीच्या माध्यमातून लढविण्याचा दावाही केला. पण, सहकारी संस्था सोडून इतर निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवाव्या लागणार असतानाही भालके यांनी समविचारीवरच जोर दिला.
भालके -परिचारक गटाचा ‘समविचारी’चा प्रयोग १८ ग्रामपंचायत निवडणुकीतही काही ठिकाणी यशस्वी झाला. सध्या सुरू असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही समविचारी आघाडीकडून अंतिम टप्यात अर्ज दाखल करण्यात आले. सध्या या निवडणुकीत १३५ जण आखाड्यात असून आमदार समाधान आवताडे, बबनराव अवताडे व समविचारी आघाडी अशी तिरंगी लढतीचे सध्या तरी चित्र आहे. मात्र, सत्तेसाठी तिघांपैकी दोघांना एकत्र यावे लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. समविचारीची राजकीय बांधणी पाहता भविष्यात आवताडे परिवाराचे राजकारण संपण्याची भीती आवताडे समर्थकांना आहे, त्यामुळे चुलते-पुतणे एकत्र याव्यात, यासाठी आपापल्या नेत्याची मनधरणी समर्थकांनी सुरू केली आहे.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून सुरू झालेल्या आवताडे परिवारातील राजकीय संघर्षाचा कार्यकर्त्यांनाही त्रास सहन करावा लागला. ते दोघे राजकीय विरोधक एकत्र येऊ शकतात, तर तुम्ही दोघे एका घरातले असतानाही का एकत्र येऊ शकत नाही? असा सवालही कार्यकर्ते विचारत आहेत. एकंदरीत मंगळवेढा तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता आवताडे चुलता-पुतण्यांनी एकत्र येऊन राजकीय पुर्नबांधणी केल्यास बाजार समितीच्या निवडणुकीतच समविचारी आघाडीला फटका बसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.