Someshwar Election: बारामतीतील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगरची पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात बंड केल्यानं ही निवडणूक चुरशीची बनली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 'श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनल'ची अंतिम उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये कोणाकोणाला संधी मिळाली जाणून घेऊयात.
या पॅनलमधील पाच गटांसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
सर्वसाधारण गट -
अभिजीत सतीश काकडे (निंबूत)
प्रमोद भगवानराव काकडे (निंबूत)
डॉ. वसंतराव रामराव दगडे (निरा शिवतकार)
इमाव -
शैलेश पंढरीनाथ रासकर (खंडोबाचीवाडी)
भज व विमुज -
अशोक चंद्रकांत धायगुडे (अंदोरी)
सर्वसाधारण -
विकास आनंदराव भोसले (वाणेवाडी)
ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड (करंजेपूल)
राजवर्धन शिवाजीराव शिंदे (मुरुम)
'ब' वर्ग -
संग्राम तानाजी सोरटे (सोरटेवाडी)
सर्वसाधारण-
रविंद्र जयवंतराव भापकर (लोणी भापकर)
मकरंद चंद्रकांत सस्ते (सस्तेवाडी)
मनिषा आनंदकुमार होळकर (सदोबाचीवाडी)
अनुसुचित जाती-जमाती -
द्वारकोजी गुलाब साळवे (वडगाव निं.)
सर्वसाधारण -
राजेंद्र हरिभाऊ बोरकर (बोरकरवाडी)
अक्षय धनंजय खलाटे (माळवाडी लाटे)
सुनील नारायण भगत (कोऱ्हाळे बु.)
महिला प्रवर्ग -
प्रणिता मनोज खोमणे (कोऱ्हाळे खु.)
सर्वसाधारण -
सतीश संपत जगताप (मांडकी)
सुधाकर ज्ञानोबा टेकवडे (जवळार्जुन)
उत्तम महादेव धुमाळ (जेऊर)
महिला प्रवर्ग -
छबुबाई अंकुश नाझिरकर (नाझरे)
पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेतली असली तरी त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही काहीही कारवाई करणार नाही. आम्ही सर्वच दादांच्या विचारांचे आहोत. कोणावरही टीका न करता कारखाना आणि बारामतीचा विकास कसा करता येईल, यावर आमचा भर असेल,’ असं जय पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.