Someshwar Factory election poster war : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे. पॅनेलची जुळवाजुळव, उमेदवारांची माघार आणि विविध राजकीय गटांच्या हालचालींना वेग आलेला असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टरने निवडणुकीच्या चर्चेला नवे वळण दिले आहे.
या पोस्टरमध्ये कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेण्यात आलेले नाही. मात्र, ‘पश्चिमेचा कटप्पा’ असा सांकेतिक उल्लेख करण्यात आला असून, त्यातून नेमका कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याची चर्चा सोमेश्वर परिसरात सुरू झाली आहे. पोस्टरवरील मजकुरातून दिवंगत अजित पवार यांच्या विश्वासाला दगा दिल्याचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टरची मोठी चर्चा होत आहे.
‘दादांच्या आधारावर मोठे झाले आणि त्याच दादांच्या कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला’, अशा आशयाच्या आरोपांमुळे या पोस्टरमागे कोणता राजकीय गट आहे, याबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, पोस्टरमध्ये नाव स्पष्ट नसल्याने आरोप नेमका कोणाविरोधात आहे, हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीला यंदा विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने कारखान्याच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांकडे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत सध्या विविध गट आमनेसामने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप आणि इतर राजकीय शक्तींनीही मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, स्वतंत्र पॅनेलमुळेही समीकरणे चर्चेत आली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.