Teachers Salary Delayed : शिक्षकांची 'दिवाळी' अंधारात! आचारसंहितेचा फटका; शिक्षकांचा पगार लांबणीवर

thousands of teachers salary payment delayed Maharashtra : आचारसंहितेचा फटका महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना बसण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी शिक्षकांचा पगार लांबणीवर पडल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. पगाराला विलंब का होत आहे, जाणून घ्या.
teacher salary delay due to election code of conduct
teacher salary delay due to election code of conductSarkarnama
Published on: 
Updated on: 

राज्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांचे समायोजन अद्याप झालेले नाही. सध्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन थांबले आहे. यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार असल्याने यांना दिवाळीत देखील पगार मिळणार नाही.

राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती मागविली होती. त्यानुसार राज्यात अजूनही सुमारे दोन हजार अतिरिक्त शिक्षकांना पर्यायी शाळांमध्ये नेमणुका मिळालेल्या नाहीत. यातील अनेकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही काही शाळांनी समायोजन करून घेतलेले नाही.

teacher salary delay due to election code of conduct
Satara Crime : शिक्षक पित्याने रागाच्या भरात पोटच्या मुलीला संपवलं; साताऱ्यात टीव्ही-मोबाईलचा वाद जीवावर बेतला

एखाद्या शाळेने अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करून न घेतल्यास त्यांच्याकडील रिक्त पद व्यपगत (कायमचे रद्द) करण्याचेही शासन आदेश आहेत. मात्र, त्यानुसार काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक शाळांनी आदेशाला बगल देऊन अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतलेले नाही. अशा शिक्षकांना आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.

अल्पसंख्यांक शाळांसाठी नवा निर्णय राज्यात सध्या अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त सुमारे आठ हजार शाळा आहेत. अल्पसंख्यांक शाळांसाठी शालेय शिक्षण विभागाचे स्वतंत्र आदेश आहेत. या शाळांच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर निर्बंध नाहीत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचेही बंधन या शाळांना नाही. या पार्श्वभूमीवर अनेक अल्पसंख्यांक शाळा बिगर अल्पसंख्यांक शाळा घेत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासनाने स्वतंत्र आदेश काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com