Chief Minister Devendra Fadnavis addresses the media following Sudhakar Badgujar's entry into BJP, offering clarity on the party’s position.  Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis News : सुधाकर बडगुजर, सलीम कुत्ता अन् भाजप..! फडणवीसांनी सांगितलं पक्षप्रवेशाचं नवं सूत्र...

Sudhakar Badgujar’s Entry into BJP : पुणे दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. सुधाकर बडगुजर यांच्या झालेल्या प्रवेशावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनीच केला होता. त्यानंतर आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने पूर्वीचे करण्यात आलेले सर्व आरोप हे पुसले गेलेत का, असा सवाल विचारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. सुधाकर बडगुजर यांच्या झालेल्या प्रवेशावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, सुधाकर बडगुजर यांच्यावर आमच्याकडून टीका करण्यात आली होती, ही गोष्ट खरी आहे. आमच्या पक्षातील नेते नितीश राणे यांनी बडगुजर यांच्या बाबतचा एक व्हिडिओ देखील प्रसारित केला होता. मात्र त्याबाबत जो गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत चौकशी करण्यात आल्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई झाली नाही.

चौकशी झाली ती, ते त्या पक्षामध्ये असताना करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी हे सर्व घडलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये ते आमच्या पक्षाविरोधात निवडणूक देखील लढले. त्या निवडणुकीत त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेली आहेत. निवडणुकीनंतर भाजपमध्ये येण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली, असे फडणवीस म्हणाले.

आमच्या पक्षात कोणी येणार असेल तर निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यांच्याकडून फक्त हीच अपेक्षा असते की, त्यांचा जुना इतिहास आणि जी वागण्याची पद्धत असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नियमांनुसार वागलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ आणि एक निवेदन दिले होते. तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. अखेर मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT