Nitin Gadkari News : टोलबाबत नितीन गडकरींकडून सर्वात मोठी घोषणा; वाहन चालकांना होणार फायदाच फायदा...

FASTag Annual Pass Launched for Private Vehicles : नितीन गडकरी यांनी सोशल मीडियातून ही घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे.
Union Minister Nitin Gadkari announces the ₹3,000 FASTag-based Annual Pass for private vehicles, aiming to simplify toll payments across national highways.
Union Minister Nitin Gadkari announces the ₹3,000 FASTag-based Annual Pass for private vehicles, aiming to simplify toll payments across national highways. Sarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari’s Vision for Hassle-Free Highway Travel : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाहनचालकांना मोठे गिफ्ट दिले आहे. टोलप्लाझांवर होणारी गर्दी, वादविवाद, विलंब टाळण्यासाठी त्यांनी बुधवारी टोलबाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता वाहनचालकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. एकाच वेळी तीन हजार रुपयांचा फास्टॅग घेऊन वर्षभर प्रवास करता येणार आहे.

गडकरी यांनी सोशल मीडियातून ही घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. या तारखेपासून तीन हजार रुपये किंमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जाणार आहे. हा पास सक्रीय झालेल्या दिवसापासून एक वर्षापर्यंत किंवा 200 वेळा प्रवासापर्यंत, जे पहिल्यांदा होईल, तोपर्यंत वैध असेल, अशी माहिती गडकरींनी दिली आहे.

फास्टॅग आधारित वार्षिक पास केवळ गैर व्यावसायिक खासगी वाहनांसाठी म्हणजे कार, जीप, व्हॅन आदी वाहनांसाठी खासकरून तयार करण्यात आला आहे. हा पास देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रवास करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

Union Minister Nitin Gadkari announces the ₹3,000 FASTag-based Annual Pass for private vehicles, aiming to simplify toll payments across national highways.
आमदाराची 'ऐश्वर्या', सौंदर्यावर अख्खं बिहार घायाळ!

वार्षिक पास सुरू करण्यासाठी किंवी नुतणीकरणासाठी लवकरच राजमार्ग यात्रा APP आणि NHAI किंवा MoRTH च्या संकेतस्थळावर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुलभ होऊ शकेल. हे धोरण 60 किलोमीटर अंतरातील टोलप्लाझांबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी सोडवू शकेल. टोल देवाणघेवाणीची प्रक्रिया एकाच माध्यमातून सुलभपणे होऊ शकेल, अशी माहिती गडकरींनी दिली.

Union Minister Nitin Gadkari announces the ₹3,000 FASTag-based Annual Pass for private vehicles, aiming to simplify toll payments across national highways.
Modi-Trump Call : पाक लष्कर प्रमुखांच्या भेटीआधीच ट्रम्प यांना मोदींनी 35 मिनिटं सुनावलं; हे 5 मुद्दे आहेत महत्वाचे...

टोल प्लाझांवरील गर्दी कमी करणे, प्रतिक्षेचा कालावधी कमी करणे आणि टोल ब्लाझांवर वादविवाद संपविण्यासाठी वार्षिक पास धोरण लाखो खासगी वाहन चालकांसाठी वेगवान आणि सुलभ प्रवासाच्या अनुभवासाठी कटिबध्द असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com