Sukhbir Badal attack case Pune connection Sarkarnama
पुणे

Sukhbir Badal Attack : माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावरील हल्ल्याचे पुणे कनेक्शन समोर, आरोपी निघाला वकील

Jaspal Singh Pune Connection : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी हा मुळचा पुण्याचा आहे. तो वर्षापूर्वी धार्मिक सेवेसाठी तो नांदेडला गेला होता.

Roshan More

Sukhbir Badal attacker Pune connection: नांदेडमधील गुरुद्वारामध्ये शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हल्ला करणाऱ्याची माहिती समोर आली असून हल्लेखोर हा मुळ पुण्यातील आहेत. हल्लेखोराचे नाव जसपाल सिंह (वय 62) असे आहे.

पोलिसांच्या चौकशीत पुढे आले की, जसपाल हा मुल पुण्यातील रहिवासी आहे. त्याने तेथे वकीलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो स्नॅक्सचे दुकान देखील चालवत होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य पुण्यातच गेले. तो दोन वर्षांपूर्वी नांदेडला धार्मिक सेवेच्या निमित्ताने शिफ्ट झाला होता.

जसपाल याने वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ एक छोटे वर्तमानपत्र चालवले होते. त्याची पत्नी पुणे कॅम्प परिसरातील एका शाळेत शिक्षिका आहे. ती आपल्या भाच्यासोबत राहत आहे. जसपाल यांच्या मुलाचे लग्न झाले असून तो आपल्या पत्नीसह पुण्यातील लुल्लानगर भागात राहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपाल हा त्याच्या परिवाराच्या संपर्कात नव्हता.परिवाराचे त्याच्यासोबत बोलणे देखील होत नव्हते. एटीएसने पुण्यातील जसपाल यांच्या घराची तपासणी केली मात्र त्यांनी संशायस्पद काही अढळले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT