Sunetra Pawar Calls Uddhav Thackeray  sarkarnama
पुणे

Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाल्या, 'बारामती पोटनिवडणुकीसाठी...'

Sunetra Pawar Calls Uddhav Thackeray : सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (ता.6) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Roshan More

Sunetra Pawar News : बारामती विधानसभेची पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सहा एप्रिलाल आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

पोटनिवडणुकीमध्ये पाठींबा देण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना केल्याची माहिती आहे. काँग्रेस निवडणूक लढण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात असताना सुनेत्रा पवार या काँग्रेस नेत्यांनाही फोन करत ही पाठींबा देण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीमधील रिक्त जागेवरून सु्नेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आम्ही उमेदवार देणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करत आम्ही बारामती आणि राहुरीमध्ये निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यांना दिल्लीतून वरिष्ठ नेत्यांकडून देखील ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्चित असल्याचे बोलले जात होते. मात्र, उद्धव ठाकरे हे सुनेत्रा पवारांना पाठींबा देण्याची शक्यता होती. त्यातच ठाकरेंना सुनेत्रा पवारांनी फोन केल्याने ठाकरेंची शिवसेना निवडणुकीच्या मैदानात नसेल हे निश्चित मानले जात आहे.

महादेव जानकर लढणार?

महादेव जानकर हे बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी त्यासाठी काँग्रेस नेत्यांची भेट घेत पाठींबा देण्याची विनंती केली होती. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला असून येथे अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT