Baramati byelection : सुनेत्राकाकींनी अर्ज दाखल करताना बोलावलं तर नक्की जाईल : पवार कुटुंबाच्या एकीसाठी सरसावले युगेंद्र पवार

Sunetra Pawar nomination News : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

Yugendra Pawar, Sunetara pawar
Yugendra Pawar, Sunetara pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते युगेंद्र पवार हे पवार कुटुंबाच्या एकीसाठी सरसावले आहेत. सुनेत्राकाकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बोलवले तर मी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्राकाकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बोलवले तर मी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.


Yugendra Pawar, Sunetara pawar
Baramati By Election: लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणार? युगेंद्र पवारांचं मोठं वक्तव्य

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार नाही. येत्या 6 एप्रिलला बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासोबतच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.


Yugendra Pawar, Sunetara pawar
Bramati By Election : बारामती पोटनिवडणुकीचे बिनविरोधच्या दिशेने एक पाऊल : भाजपचा पुढाकार, स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांची भूमिका पुढे नेणार...

लोकशाहीमध्ये निवडणूक लढविण्याचा अधिकार सर्वांचा आहे. सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की आगामी काळात होत असेलली ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. तीच खरी श्रद्धांजली अजितदादांना असेल. आम्ही सगळेच जण सुनेत्राकाकींचा प्रचार करणार आहोत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शंभर टक्के त्याच निवडून येणार आहेत. याची खात्री सर्वांना आहे, असेही युगेंद्र पवार म्हणाले.


Yugendra Pawar, Sunetara pawar
Baramati bypoll : बारामतीच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थोपटले दंड, उमेदवारीवर थेट भाष्य

त्यासोबतच येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात, अशी आम्हची इच्छा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँगेसचे विलानीकरणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते घेतील, असेही यावेळी युगेंद्र पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.


Yugendra Pawar, Sunetara pawar
Baramati By Election: मोठी बातमी: बारामती पोटनिवडणुकीत 'बिनविरोध'ची शक्यता मावळली; पहिल्याच दिवशी तीन अर्ज दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com