Malegaon Sugar Factory Director : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखानाच्या संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदार संघ संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज (ता.18) बिनविरोध निवड झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला.
माळेगावची ही निवडणूक प्रक्रिया प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अधिपत्याखाली पार पडली. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जावर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली, तर संचालक तानाजी कोकरे यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा प्रांताधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे कारखान्याच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता वाढली असून, अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रात या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी माळेगावच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, नितीन शेंडे, ज्योती मलमुले, राजेंद्र बुरुंगले, रामदास आटोळे, गणेश खलाटे, प्रताप आटोळे, रतन भोसले, सतीश फाळके, देविदास गावडे, स्वप्निल जगताप, विशाल जगताप, कामगार संचालक अनिल जगताप , तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“अजित दादांच्या स्वप्नातील कारखाना पुढे नेण्यासाठी त्यांच्या वारशाला न्याय देणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळेच सर्व संचालक मंडळाने सुनेत्रा पवार यांची ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालक म्हणून बिनविरोध निवड केली. पुढील आठवड्यात होणाऱ्या माळेगावच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्याच अध्यक्ष होतील, अशी शेतकरी व सभासदांची तीव्र इच्छा आहे,” असा विश्वास बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.