Guardian Minister Sunetra Pawar attends her first Pune District Planning Committee (DPC) meeting via video conference, finalizing the 2026-27 district development plan before CM Fadnavis’ approval. Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे DPC ची पहिलीच बैठक : CM फडणवीस दुपारी लगेचच करणार शिक्कामोर्तब

Pune DPC Meeting News : पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक घेत 2026-27 चा विकास आराखडा अंतिम केला असून त्यावर दुपारी मुख्यमंत्री फडणवीस शिक्कामोर्तब करणार आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उद्या गुरूवारी (ता.12) पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होणार आहे. नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच पालकमंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याच नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. जिल्हा परिषदेकडून या बैठकीसाठी जिल्ह्यातील सगळ्या आमदार आणि खासदार आणि जिल्हा नियोजन समिती सदस्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान, या बैठकीला सुनेत्रा पवार या प्रत्यक्ष उपस्थित न राहता मुंबई येथून वीडियो कॉन्फरन्स द्वारे बैठकीला हजेरी लावणार आहेत. पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच बैठक असल्याने त्या कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील जुन्या विधान भवनामध्ये ही बैठक होणार आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील आठवड्यात होत आहे. अर्थसंकल्पा पूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्हा नियोजन समितीचा आढावा, त्याचबरोबर पुढील वर्षाचा प्रस्तावित आराखडा यावर चर्चा होऊन त्याला मंजुरी दिली जाते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलविली आहे.

या बैठकीमध्ये वर्षभरातील एकुण कामांचा आढावा, सन 2026-27 या वर्षासाठीचा प्रस्तावित आराखडा आणि राज्य सरकारकडे आराखड्याच्या अनुषंगाने करावयाची निधीची मागणी या विषयांवर सखोल चर्चा करून आराखडा अंतिम केला जाईल.

त्यानंतर दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत तो सादर केला जाणार आहे. त्यामुळे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयावर दुपारी लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्कामोर्तब करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT