Pune News : नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी होती. तब्बल अडीच हजार भाजप कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पक्षाचे तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले इन्कमिंग आणि जागेच्या मर्यादेमुळे अनेकांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही.
त्यामुळे काही इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात बंडाच निशाण फडकाव निवडणूक लढली तर काही कार्यकर्त्यांनी विरोधातील नेत्याला निवडणुकीमध्ये मदत केली. अशा कार्यकर्त्यांवर पक्षाने आता कारवाईच्या भडगा उगारला आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 69 जणांची यादी तयार केली असून त्यांच्यावर तब्बल सहा वर्षांचा निलंबन करण्यात आला असल्याचा समोर आला आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघातून 7 जणांचा समावेश आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून 6, कसबा विधानसभा मतदारसंघातून 6,हडपसर विधानसभा मतदारसंघातुन 19, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 9, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून 8, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून 9 आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून 4 असे एकूण 69 जणांचा समावेश आहे.
यातील बहुतांशी जणांनी पक्षाकडून हकालपट्टी होण्याच्या आधीच पक्षाला सोडचिट्टी दिली असल्याचे देखील सांगितले जात आहे. याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे.
पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या आहेत. असं घाटे यांनी सांगितलं आहे.
धनंजय जाधव
चंद्रकांत पोटे
कादंबरी साळवी
जितेंद्र दळवी
किशोर तरवडे
अमोल बालवडकर
सोमनाथ गुंड
मानसी सोमनाथ गुंड
अनिता तलाठी
पल्लवी गाडगीळ
दत्ता भगत
विनोद मोहिते
रमेश भंडारी
समाधान शिंदे
मधुकर मुसळे
प्रकाश ढोरे
बाळासाहेब रानवडे
मंजू वाघमारे
प्रीती वालेकर
संदीप लोणकर
स्मिता गायकवाड
संतोष शिंदे
युवराज कुचेकर
इम्तीयाज मोमीन
पुरुषोत्तम अण्णा दारवाटकर
अभिजीत डोंगरे
छाया गदादे
नवल कुंजीर
समीर पठाण
प्रणव मोरे
योगेश सूर्यवंशी
अश्विनी योगेश सूर्यवंशी
नलिनी मोरे
संगिता ठोसर
अनिल मेमाणे
नितीन मारकड
सतिश मारकड
वर्षा मारकड
रुपेश घुले
बाप्पू पोकळे
किरण बारटक्के
अमोल रायकर
संदीप पोकळे
मोहिनी देवकर
रितेश रासकर
सचिन दशरथ दांगट
सुरेंद्र कंधारे
संदीप जहऱ्हाड
सुनीता गलांडे
किशोर वाघमारे
विजय चौगुले
अन्वर पठाण
राजू साखरे
ऐश्वर्या जाधव
जितेंद्र जगताप
प्रवीण खेडकर
स्मिता खेडकर
उज्ज्वला गौड
बाळासाहेब घोडके
सुरेश धनगर
स्वाती धनगर
सुवर्णा भरेकर
पल्लवी केदारी
राहुल शर्मा
हरिष परदेशी
बंडू जायभाय
नीता थोरवे
प्रीतम नागापुरे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.