Sunetra Pawar addressing party workers and supporters after Zilla Parishad and Panchayat Samiti elections, thanking voters and NCP cadres for unity and commitment. Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : निवडणुका संपताच सुनेत्रा पवारांंचा कार्यकर्त्यांसाठी खास संदेश; 'म्हणाल्या, दुःखाच्या काळातही...'

Pune ZP NCP Election Message : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार यांनी मतदार, कार्यकर्ते व हितचिंतकांचे आभार मानत दुःखाच्या काळातही पक्ष एकजुटीने उभा राहिल्याचे सांगितले.

Sudesh Mitkar

Pune ZP News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे.

काल सुनेत्रा पवार यांनी स्वतः बारामतीतील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना मतदानाचे आवाहन केले होते. त्यानंतर आज त्यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आहेत.

सुनेत्रा पवार म्हणल्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही, आपले लाडके नेते, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पपूर्तीसाठी शिस्तबद्ध, एकजुटीने आणि निष्ठेने पक्षासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवर नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे विशेष आभार.

आपल्या समर्पणामुळे, अथक परिश्रमांमुळे आणि संघटित प्रयत्नांमुळेच पक्षाचे तसेच आदरणीय अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षम आणि परिणामकारकपणे पुढे जात आहे. असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT