Pune News : ‘हो, आमची व्यवस्था कमी पडली!' 'एक्सप्रेस वे'वरील महाप्रचंड वाहतूक कोंडीनंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली चूक
Pune News : ‘हो, आमची व्यवस्था कमी पडली, असं म्हणत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गंभीर वाहतूक कोंडीनंतर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रशासनाची चूक मान्य केली आहे. तसेच आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेला टँकर हटवण्यासाठी एवढा वेळ का लागला, याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आमची व्यवस्था कमी पडली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर असे अपघात पूर्वीही घडले आहेत, पण या घटनेत टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने टँकर बाजूला काढण्यास आणि गळती थांबवण्यास अडचणी आल्या. सामान्यतः अशा अपघातांना 8 तासांच्या आत प्रतिसाद दिला जातो, पण या प्रकरणात गॅसच्या ज्वलनशील स्वभावामुळे वेळ लागला. योग्य प्रयोग पद्धतीने ही घटना हाताळली नसती तर मोठी दुर्घटना देखील होऊ शकले असती.
आता मात्र अशा घटना पुढे टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यात चालकांसाठी नवीन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यासह इतर प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश आहे. याबाबत उपाययोजना सुरू आहेत. " असे जिल्हाधिकारी डूडी यांनी स्पष्ट केले.
या अपघातामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एसटी बसेस बंद करण्यात आल्या, जुना महामार्ग ओव्हरलोड झाला आणि पर्यायी मार्गांवरही कोंडी निर्माण झाली. प्रशासनाने बचाव पथके, केमिकल तज्ज्ञ आणि मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल केल्या होत्या. टँकर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते आणि नंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. हा अपघात प्रशासनासाठी पहिल्यांदाच इतका विचित्र आणि आव्हानात्मक ठरला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारत आमची व्यवस्था कमी पडली." असे कबूल केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

