Sunil Tatkare, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

NCP Politics : अजितदादांच्या शब्दाला किंमत नाही? सूरज चव्हाणा प्रमोशन का दिलं? सुनील तटकरेंनी खरं कारण सांगितलं

Sunil Tatkare Suraj Chavan Ajit Pawar : सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत माहिती नसेल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे या नेमणुकीमागे कोण याचे उत्तर सुनील तटकरे यांनी दिले.

Roshan More

Sunil Tatkare News : लातूरमध्ये छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेध्याक्ष सूरज चव्हाण याने मारहाण केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट कत सूरज यांना पक्षातून निलंबित करत असल्याचे जाहीर केले. मात्र, या निलंबनाला तीन आठवडे होण्याच्या आधीच सूरज यांना पक्षात प्रमोशन मिळाले.

सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आली. सुनील तटकरे यांनी सूरज यांना नियुक्ती पत्र दिले. त्यामुळे अजितदादांनी निलंबित करूनही सूरज चव्हाण यांना प्रमोशन कसे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

अजित पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी मला त्याबाबतची माहिती नाही. मी त्या बैठकीला नव्हतो. मी त्याबद्दलची माहिती घेतो. मला त्यावेळेस जे खटकलं, मी तेव्हा निर्णय घेतला, असे म्हटले. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत अजितदादा अनभिज्ञ असल्याचे समोर आले. अखेर सूरज यांची नियुक्ती नेमकी का कोणाच्या निर्णयाद्वारे झाली याचे स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

तटकरे म्हणाले, 'लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपआपले मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे. पक्षाने वरिष्ठ ग्रुपने कोअर ग्रुपने त्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटल्या जातीलच.'

तटकरे यांनी वरिष्ठ कोअरग्रुपने निर्णय घेतल्याचे सांगत. छावा संघटनेने नियुक्तीला घेतलेल्या आक्षेपाला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे छावा संघटनेकडून तटकरे यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी...

सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT