Chicken-Mutton Ban : दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा मच्छी-मटण; आंदोलक महापालिकेवर कोंबड्या घेऊन पोहोचले!

KDMC Chicken Mutton Ban : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या चिकन मटण बंदीच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्यांनी महापालिकेच्या परिसरता कोंबड्या सोडल्या.
Protesters gathered outside Kalyan-Dombivli Municipal Corporation opposing the chicken and mutton sale ban.
Protesters gathered outside Kalyan-Dombivli Municipal Corporation opposing the chicken and mutton sale ban.sarkarnama
Published on
Updated on

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्टला चिकन, मटन विक्रीवर बंदी घातली आहे. कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यानिमित्त महापालिकेच्या विरोधात आज खाटीक समाजाने तसेच काँग्रेसने आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य चिकन मटन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष घोणे आणि हिंदू खाटीक समाजाचे पदाधिकारी यांनी कोंबडी सोडत केले आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त महापालिकेच्या परिसरता ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना अडवून गाडीत टाकून बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेले.

काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा मच्छी-मटण, अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात कोंबड्या घेत आंदोलन केले.

गुरुवारी खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत घेत बंदी मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, आयुक्तांनी हा शासनाचा निर्णय असल्याचे अजब उत्तर त्यांना दिले. समाधानकारक उत्तर न दिल्याने खाटीक समाजाने आज आंदोलनाचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.त्याप्रमाणे त्यांनी आंदोलन करत पालिकेचा निषेध केला.

Protesters gathered outside Kalyan-Dombivli Municipal Corporation opposing the chicken and mutton sale ban.
Contractor Suicide Attempt Wardha : दोन वर्षांपासून बिलासाठी पाठपुरावा; कार्यकारी अभियंत्याच्या पैशाच्या मागणीला कंटाळेल्या कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल...

महापालिकेत परिसरात प्रवेश बंदी

कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात 100 मीटर अंतरावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.तसेच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.

Protesters gathered outside Kalyan-Dombivli Municipal Corporation opposing the chicken and mutton sale ban.
Congress setback : मनावर दगड ठेवून 45 वर्षांची निष्ठा संपवली, खान्देशात आणखी एका पदाधिकाऱ्याने कॉंग्रेस सोडली..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com