MLC Election : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. सुनील टिंगरे यांना देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे विक्रमक काकडेंना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे.
विक्रम काकडे हे देखील फाॅर्म दाखल करणार आहेत. त्यामुळे नेमकी एबी फाॅर्म मिळणार याची उत्सुकता आहे. दोघांपैकी कुणालाही एबी फाॅर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे एबी फाॅर्म कोणाला मिळणार याची उत्सुकता असणार आहेत. अंतिम उमेदवार कोण याचा निर्णय अर्ज माघारीच्या दिवशी होण्याची शक्यता असून, त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी विक्रम काकडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे घाईघाईने त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. मात्र, आमदारांनी काकडेंना विरोध कायम ठेवल्याने सुनील टिंगरे यांन देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पक्षाने सांगितले.
या संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामाचा क्लायमॅक्स आता थेट 'अर्ज माघारीच्या दिवशी' पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला पक्षाचा अधिकृत आशीर्वाद मिळणार, याचा फैसला त्याच दिवशी होईल. तोपर्यंत राष्ट्रवादीने निर्माण केलेला हा सस्पेन्स पुण्याच्या राजकीय पटलावर चांगलाच गरमागरम राहणार असून, अंतिम उमेदवार कोण ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.
दरम्यान, सुनील टिंगरे यांंनी माध्यमांशी बोलतना सांगितले की पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील तर, उमेश पाटील यांनी सांगितले की, पक्षाकडून अधिकृत उमेदवारी विक्रम काकडे यांना जाहीर केली आहे. माध्यम विनाकारण भ्रम निर्माण करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.