Sunil Tingare| Jagdish Mulik
Sunil Tingare| Jagdish Mulik Sarkarnama
पुणे

BJP-NCP Politics: निष्क्रियतेचा भोपळा फुटला म्हणणाऱ्या मुळीकांनी आमदारकी फुकट घालवली; टिंगरेंचा हल्लाबोल !

सरकारनामा ब्युरो

Pune Politics : वडगाव शेरी मतदारसंघातील वेगवेगळ्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील टिंगरे हे पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज उपोषणाला बसले होते. पण महापालिका प्रशासनाने विकासकामांबाबत लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आमदार टिंगरे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. पण टिंगरे यांच्या या आंदोलनावरुन पुण्यातील दोन आजी-माजी आमदार आमनेसामने आले आहेत. (Sunil Tingre's reply to Jagdish Mulik's criticism)

जगदीश मुळीक यांची टिका

भाजप शहराध्यक्ष दगदीश मुळीक यांनी टिंगरे यांच्यावर निशाणा साधत त्यांची ही कृती म्हणजे निष्क्रियतेचा भोपळा फुटल्याचे प्रतिक असल्याचे मुळीक यांनी म्हटलं आहे. सुनील टिंगरेचं उपोषण ही नौटंकी असून त्यांचं अपयश आहे. मागच्या साडेतीन वर्षात त्यांना वडगाव शेरीत एकही मोठा प्रकल्प आणता आला नाही, याचं हे प्रमाणपत्र आहे. वडगाव शेरीतील जनतेने त्यांना निष्क्रिय आमदार म्हणून उपाधी दिली आहे. ती आज सिद्ध होतेय. साडेतीन वर्षात कोणतही मोठ काम न केल्यामुळे आपलं अपयश लपवण्यासाठी आज त्यांना महापालिकेच्या बाहेर उपोषण करावं लागतं आहे. अशी टिका मुळीक यांनी केली आहे.

वडगाव शेरी, लोहगाव, विश्रांतवाडीत भाजपच्या (BJP) माध्यमातून विविध विकासकामे सुरु आहेत. याशिवाय काही कामे मंजूर झाली आहेत. या कामांचे श्रेय लाटण्यासाठी टिंगरे आज उपोषण करत आहेत. या उपोषणामागे कोणतही तथ्य नाही, विकासाची भूमिका नाही. असा आरोपही त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळातही त्यांनी वडगाव शेरीत एकही विकासाचा प्रकल्प आणला नाही.महापालिकेची जी काम आहेत त्या ठिकाणी जायचं आणि नारळ फोडायचा, त्याचं क्रेडीट घ्याययं हाच उद्योग त्यांनी गेले साडेतीन वर्षे केला. अशी टिका मुळीक यांनी केली आहे.

सुनील टिंगरे यांचं प्रत्युत्तर

दरम्यान, सुनील टिंगरे यांनीदेखील मुळीक यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. शहरात भाजपचे सहा आणि आमचे राष्ट्रवादीचे दोनच आमदार आहेत. जगदीश मुळीक स्वत: आमदार होते, त्यांना त्यांच्या काळात हे प्रश्न सोडवता आले नाहीत. ते आज आमच्या काळात सुटतायेत. 2019 ला वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी जगदिश मुळीकांना घरी पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिलं. मोदी लाट असतानाही ते निवडून आले नाही.आता माझ्या कामांचा धडका पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकरलीये. अशा शब्दांत सुनील टिंगरे यांनी मुळीकांवर पलटवार केला.

तसेच, कोणतेही राजकीय आरोप न करता मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणालानिर्णय घेतला. माझ्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहून मुळीक घाबरले आहेत. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. ते पाच वर्ष ते आमदार होते. पण तरीही त्यांना मतदार संघातील हे प्रश्न सोडवता आले नाहीत.मी विरोधी पक्षात असतानाही मतदार संघासाठी सर्वात जास्त निधी आणला. आता मतदारसंघातले प्रश्न मार्गी लागत असल्याने मुळीक निरर्थक बडबड करत आहेत. असा टोलाही सुनील टिंगरे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT