BJP- NCP Politics: सावरकर गौरव यात्रेला राष्ट्रवादीचे उत्तर; फुले-आंबेडकर जयंती दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Maharashtra Politics| राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले. आता भाजपच्या या सावरकर गौरव यात्रेला उत्तर देण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 'महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनांच्या निमित्ताने या महापुरुषांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. लोकशाही प्रबळ करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांनी केले आहे.

Jayant Patil
Ashish Deshmukh Join Ncp : काँग्रेसमधील कोंडीमुळे आशिष देशमुख घड्याळाचा हात धरणार?

तसेच, ११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकात नमूद असलेल्या अंधश्रद्धा, कर्मठ जातीयवाद, स्त्री वर्गाची स्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी महत्त्वाच्या विषयांची आजच्या परिस्थितीशी तुलनात्मक चर्चा करायची आहे. यादृष्टीने वक्ता, प्राध्यापक किंवा विचारवंत यांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात यावेत, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली आहे.

१४ एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, गाव पातळीवर त्यांचे स्मारक असलेल्या चौकांमध्ये सकाळी १० वाजता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घटनेच्या रक्षणाकरता प्रतिज्ञा वाचन करावे. तसेच कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या देशाच्या घटनेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगावे. घटनेचा अपमान रोखण्यासाठी तसेच सर्व समाजांमध्ये बंधुभाव, प्रेम, सलोखा टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com