Supriya Sule Vs Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : सुप्रिया सुळेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा; एका रस्त्याच्या कामासाठी मोठा निर्णय...

NCP SP Politics Pune District update Baneshwar Road issue : रस्त्याच्या निधीबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

Rajanand More

Pune News : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत प्रशासन किती उदासीन आहे, याची प्रचिती खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनाच आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने खासदार सुळेंनी थेट बेमुदत उपोषण करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. त्या मंगळवारपासून (ता. 4) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत उपोषणाची माहिती दिली आहे. बारामीत लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणारा बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या साधारणतः एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्या उपोषण करणार आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थासह मी स्वतः वारंवार जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा केला. महाशिवरात्रीपूर्वी रस्ता दुरुस्त व्हावा अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिल्यानंतर पीएमआरडीएने रस्त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याचे लेखी कळवले.

पीएमआरडीए व जिल्हा परिषद या रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. या रस्त्याच्या निधीबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मी 26 फेब्रुवारी रोजी दिला होता. जिल्हा परिषद अथवा पीएमआरडीए यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे आश्वासन अथवा ठोस कृती करण्यास तयार नाही. एका रस्त्यासाठी जर एवढा मोठा पाठपुरावा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असेल तर ती शासन व प्रशासनाची असंवेदनशीलता आहे, असा संताप सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आहे.

प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेविरोधात खासदार सुळे उद्या ता. 4 मार्च पासून पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. शासन व प्रशासनाने याची नोंद घ्यावी, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. खासदार सुळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT