Bhor area leaders joining Ajit Pawar group Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना आणखी एक धक्का, भोरचे शहराध्यक्ष अजित पवारांच्या गोटात !

Baramati Lok Sabha Constituency : शरद पवार गटातील भोर परिसरातील नेते, कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये सामील होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.

Sudesh Mitkar

Baramati News : बारामती मतदारसंघातील निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी अस्तित्वाची तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी दोन्हीही गटांकडून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू असून, प्रचाराचा धडाकादेखील जोरदार सुरू आहे. शरद पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तब्बल 25 वर्षांनंतर त्यांनी भोर आणि वेल्हा परिसरात सभा घेतल्या आहेत, तर दुसरीकडे अजित पवारदेखील बारामती लोकसभा मतदारसंघात आपला जोर लावत आहेत.

एका बाजूला अजित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फौज असून, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यासोबत काही मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे यांच्या गटातील भोर परिसरातील नेते, कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये सामील होत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीमध्ये असलेले ठाकरे गटाचे नेते कुलदीप कोंडे हे शिंदे गटात सामील होऊन महायुतीचे काम करत आहेत. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना भोर (BHOR) मतदारसंघातील हायवे पट्ट्यामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा मतदारसंघात सुळे यांची मदार भोर खोऱ्यावरती असून, आता याच परिसरातील शरद पवार गटातील नेते अजित पवारांना जाऊन मिळाले आहेत. भोर शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षासह काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

पुण्यातील जिजाई बंगला येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR), माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भोर शहराध्यक्ष माजी नगरसेवक यशवंत डाळ, अनंत दुधचे कार्यकारी संचालक नितीन थोपटे, काँग्रेसचे सोमनाथ ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे भोर शहरात आणि वीसगाव खोऱ्यात याचा मतदानावर परिणाम होईल अशी स्थिती आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे खासदार सुप्रिया सुळे यांची साथ सोडून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT