Sharad Pawar At Velhe : सुप्रिया सुळेंसाठी 25 वर्षांनंतर शरद पवार वेल्ह्याच्या आखाड्यात

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी तब्बल 25 वर्षांनंतर शरद पवार वेल्ह्यात येणार आहेत. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून जोरदार तयारी पूर्ण झाली असून, या ठिकाणी हेलिपॅडची सुविधाही करण्यात आली आहे.
Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama

Pune News : बारामती मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या प्रचारासाठी तब्बल 25 वर्षांनंतर शरद पवार Sharad Pawar यांची वेल्ह्यात (राजगड) आज 30 एप्रिलला दुपारी दोन वाजता मेंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदानासमोरील प्रांगणात सभा होणार आहे. अजित पवार यांनी भोर वेल्ह्याला 'एमआयडीसी' देण्याचा शब्द दिल्यानंतर या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याची मोठी उत्सुकता नागरिकांना लागली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून जोरदार तयारी पूर्ण झाली असून, या ठिकाणी हेलिपॅडची सुविधाही करण्यात आली आहे.

भोर-राजगड-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे Supriya Sule यांचा प्रचाराचा सर्व भार उचलला असून, गावागावांमध्ये जाऊन ते जोरदार प्रचार करत आहे. तसेच ठाकरे गटाचे कुलदीप कोंडे हे जरी महायुतीमध्ये दाखल झाले असले तरी यामुळे ठाकरे गटाची ShivsenaUBT दुसरी फळी कामाला लागली असून या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Ajit Pawar News : मोदींच्या पुण्यातील सभेत अजितदादांचा 'रुबाब' भारी !

गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये Loksabha Election राजगड तालुक्यातील नागरिकांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास टाकत तीनही निवडणुकांमध्ये मताधिक्य दिले होते. मात्र, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने तसेच महत्त्वाची पदे असलेले अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत गेल्याने तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

अजित पवार Ajit Pawar हे शरद पवार, सुप्रिया सुळे NCP यांच्यावर टीका करत असून, त्यातच भोरमध्ये झालेल्या सभेमध्ये यांनी सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्षे काय केले नुसते बोलून चालत नाही तर काम करावे लागते असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस कडून आमदार संग्राम थोपटे Sangram Thopate तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिलिंद नार्वेकर Milind Narvekar उपस्थित राहणार आहेत.

R

Supriya Sule
Narendra Modi Rally In Pune : 'मोदी अभी जिंदा है...' भरसभेत ठणकावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com