Supriya Sule|
Supriya Sule| 
पुणे

सुषमा स्वराज यांच्या 'त्या' वाक्याची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंचा केंद्राला सवाल

सरकारनामा ब्युरो

Supriya Sule on Central Government

पुणे : जीवनावश्यक वस्तूंवरील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (congress) पुण्यात आंदोलन करण्यात आले. बाजीराव रोडवरच्या शनिपार चौकात झालेल्या या आंदोलनात सुप्रिया सुळेंनी आरती देखील केली. तसेच, मारूती स्तोत्र पठणामध्ये देखील त्या सहभागी झाल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केंद्रातील भाजप (bjp) सरकारवर निशाणा साधला.

2013-14 मध्ये वाढलेल्या महागाईच्या विरोधात त्यावेळी दिवंगत सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण सांगितली. “२०१३-१४मध्ये ज्या पद्धतीने महागाई झाली होती, त्यापेक्षा आज चारपट महागाई वाढली आहे. सुष्माताईंचं भाषण मला मनापासून भावलं. तेव्हा त्यांनी आमच्या सरकारला म्हटलं होतं की, 'आंकडों से पेट नहीं भरता. जब भूख लगती है तब धान लगता है..'' आज मला देशाच्या पंतप्रधानांना आज हाच प्रश्न विचारायचा आहे की, "आंकडों से पेट नहीं भरता. जब भूख लगती है तब धान लगता है”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आम्ही गॅसवरील सबसिडी सोडली. त्याने देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असं वाटत होतं. पण असं काही झालं नाही नसून ही दरवाढ वाढत चालली आहे”, असं त्या म्हणाल्या. पण सरकारने झोपेचं सोंग घेतलं आहे. त्या सरकारला सुबुद्धी देण्यासाठी मी साकडं देवाला घालणार आहे. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या देशांमध्ये जी काही परिस्थिती उद्भवली आहे ती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाईवर नियंत्रण कसे मिळवता येईल यावर लक्ष देण्याची गरज आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आज त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक येथील समाधीस्थळालाही भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेदांवरही भाष्य केलं. ''महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र कुटुंब म्हणुन काम करतात आणि कुटुंबात भांड्याला भांड लागतेच त्यामुळे काही मतभेद झाले असतील हे मतभेद चर्चे सोडवले जाणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. तीन पक्ष एकत्र काम करत असताना प्रत्येक गोष्टीला होकार दिला तर ती दडपशाही समजली जाते आणि ही दडपशाही महाविकास आघाडी करत नाही,'' असेही खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT