बच्चू कडू यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर आरोप केला होता.
Bachchu Kadu Latest News in Marathi
Bachchu Kadu Latest News in Marathisarkarnama
Published on
Updated on

अकोला : राज्यमंत्री, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याविरोधात विविध कलमान्वये अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी बच्चू कडू यांनी अकोला (Akola) जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांना न्यायालयाने (Court) आज बुधवार (ता. ११) अटकपूर्वक जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Bachchu Kadu Latest News)

वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी बच्चू कडू यांच्यावर रस्त्याच्या बांधकामांमध्ये अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रारही केली होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहारासह विविध कलमान्वये बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जवळपास एक कोटी 95 लाख रुपयांच्या रस्त्याच्या अपहाराचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

Bachchu Kadu Latest News in Marathi
देशद्रोहातून दिलासा मिळू शकतो पण राणा दाम्पत्याला 'ही' दोन कलमे पडणार महागात?

न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करीत त्यांना नऊ मे पर्यंत अटकपूर्व जामीन दिला होता. नियमित जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी तपास अधिकारी यांना पुढील सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज 11 मे रोजी दुपारी एक वाजता सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामीन मंजूर केला. बच्चू कडू यांची न्यायालयात बाजू अॅड. बी.के. गांधी यांनी मांडली.

Bachchu Kadu Latest News in Marathi
नाना पटोले तोंडाची वाफ घालवण्या पलिकडे काहीही करू शकत नाहीत; दरेकरांचा टोला

दरम्यान, ग्रामीण भागातील रस्ते, पुलाच्या कामात अनियमिता झाल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि चौकशीची परवानगी मिळावी, याकरीता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांना सविस्तर निवेदन सादर केले होते. याची दखल घेत राज्यपालांनी, याप्रकरणी योग्य कारवाई करा, असे निर्देश अकोला पोलीस अधीक्षकांना दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com