Supriya Sule at Pune Students agitation : राज्यात एकीकडे बदलापूरच्या घटनेवरून जनतेमधून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत असताना, राजकीय वातावरणही तापलेलं असताना आता दुसरकीडे पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने वातावरण आणखीच तापवलं आहे.
याला कारण म्हणजे MPSC आणि IBPS या दोन्ही महत्वपूर्ण परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण तयार झाले आहे. यावरूनही विरोधकांना राज्य सरकारला जाब विचारत टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रसे पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली.
सुप्रिया सुळे(Supriya Sule) पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आणि म्हटले की, 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यामुळे एका परिक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी विविध माध्यमांतून शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.'
तसेच 'त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर ही परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील.' असंही सुळेंनी सांगितलं.
याशिवाय, 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहीर करावे.' अशी मागणी सुळे यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.