Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : मटण वादानंतर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या, माझं आणि पांडुरंगाचं नातं...

Supriya Sule’s Clarification on Mutton-Eating Controversy : लोकांना माझ्यावर एका सशक्त लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : माझ्या पांडुरंगाला जर मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय अडचण आहे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केला होता. 'आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही', असंही त्या म्हणाल्या होत्या. या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे रविवारी पुणे दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मटण वादासह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्षष्ट केली. त्या म्हणाल्या, लोकशाही मध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु मला जे योग्य वाटतं ते मी बोलते आणि करते. मी काय ईडी ना सीबीआय यांना कोणाला काय केलं नाही. मी रामकृष्ण हरीवाली आहे. लोकांना माहिती आहे माझं आणि पांडुरंगाचं काय नातं आहे. लोकांना माझ्यावर एका सशक्त लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं.

लाडकी बहीण योजनेच्या बोगस नोंदणीबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, बोगस लाडक्या बहिणींबाबत पंधरा दिवसांपूर्वीच मी बोलले होते. हा तब्बल 4800 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. 25 ते 26 लाख लोकांना तुम्ही पैसे देता तर त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल. तसंच काय निकष लावून फॉर्म भरले आणि काय निकषाने कॅन्सल केले याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.

तुम्ही विचार करा, 4800 कोटी यामध्ये काय काय झालं असतं? शाळा, कॉलेज, रुग्णालयांना आणि रस्ते निर्मितीला मदत झाली असती. तसेच सरसकट कर्जमाफीला देखील आधार मिळाला असता. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने यासाठी एसआयटी चौकशी लावावी आणि पारदर्शकपणे सगळ्या गोष्टी समोर आणणे आवश्यक असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुणे जिल्हासारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात, तर हा मोठा भ्रष्टाचार आहे. ही योजना बंद करा म्हणून प्रयत्न नाही. पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे. योजना बंद करून प्रश्न सुटत नाहीत. सुधारणा केल्या पाहिजेत. जर लाडक्या बहिणी तुमच्या खरंच लाडक्या असतील तर बहिणींसाठी सुधारणा करणे हे सरकार मधील भावांचं कर्तव्य आहे, असेही खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT