Pratibha Pawar - Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule News: तुमचं सरकार येणार नाही अन् तुम्हाला मतदानही...'; प्रतिभा पवार सुळेंना असं का म्हणाल्या होत्या?

Sudesh Mitkar

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे या शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये अॅक्टिव्ह झाल्या आहेत. बारामती मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान थेट अजित पवारांवरती टीका करणे टाळणाऱ्या खासदार सुळे आता अजित पवारांवरती हल्लाबोल करू लागल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शनिवारी हडपसर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी सुळे उपस्थित होत्या. यावेळेस बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सरकारच्या काळामध्ये कांद्याला आणि दुधाला दर नाहीत. महागाई भरमसाठ वाढली आहे. 2014 मध्ये केंद्रामध्ये आपलं आघाडीचे सरकार होतं. माझी आई मला म्हणायची तुमचं सरकार येत नाही.आपलं सरकार असताना,माझे वडील केंद्रामध्ये मंत्री असताना माझी आई आमचं केंद्रामध्ये सरकार येणार नाही, असं म्हणायची. त्यामुळे मला आश्चर्य वाटायचं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महागाई खूप वाढलेली आहे, त्यामुळे मी देखील तुम्हाला मतदान करणार नाही. तुमचं सरकार येणार नाही, असं आई सांगायची तेव्हा मी तिला सांगितले, इथे बोलली, बाहेर बोलू नको. मात्र, ही गोष्ट खरी होती की, महागाई इतकी वाढली होती, की त्यावेळी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोक कंटाळली होती असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.काही लोक म्हणतात की, सत्तेत गेल्यानंतर काम होतात.आता ते सत्तेत गेल्यानंतर रोज आमच्या विरोधात भाषण करतात.

कांद्याच्या वाढलेल्या भावाबद्दल एक अवाक्षर काढत नाहीत. फक्त शरद पवारांना कधी रिटायर होणार एवढेच विचारतात. ते जर म्हणत असतील की वाढपी मीच आहे. तर दुधाला पन्नास चा भाव देऊन दाखवा असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं (Ajit Pawar) नाव न घेता केलं. मलिदा गँग वगैरे मी म्हणत नाही. ते रोहित पवार याबाबत बोलतात. मी बोलत नाही.नाहीतर आत्या देखील रोहित सारखाच बोलायला लागली असं म्हणतील. माझे केस थोडे पांढरे झाले आहेत. त्यामुळे मी असले भाषण करत नाही. हा प्रश्न पोरांसाठी आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT