Nitin Gadkari News : पुण्याच्या विकासासाठी मोदींसोबत माझंही इंजिन लागणार; गडकरींची ग्वाही!

Lok Sabha Election 2024 : केवळ पश्चिम महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींची कामे झाली आहेत. तर राज्यासाठी 5 लाख कोटींपेक्षा अधिक कामे करण्यात आली आहे," असे गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari.
Nitin Gadkari.Sarkarnama

Pune News : देशात स्वातंत्र्यापासून काँग्रेसची सत्ता होती. पण त्यांनी काँग्रेसन देशाच्या समस्या सोडवल्या नाहीत. पण भाजपने गेल्या 10 वर्षात काँग्रेसपेक्षाही तीनपटीने जास्त काम केले. पायभूत सुविधांवर भर दिला. गोर गरिबांचे कामही भाजपनेट केले. पण भाजपचं एवढं काम म्हणजे फक्त ट्रेलर आहे, पुण्याच्या मोदींच्या या विकासासाठी मोदींच्या इंजिनसह माझंही इंजिन असेल, त्यामुळे जात, धर्म याचा विचार न करता भाजपला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरींनी केले. (Latest Marathi News)

पुण्यात नातूबाग येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून सभा आयोजित करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे लाेकसभा भाजप उमेदवार उमेदवार मुरलीधर मोहोळ, राज्यसभेवरील खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर, हेमंत रासने, शैलेश टिळक, स्वरदा बापट सभेला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

गडकरी म्हणाले, "पुणे शहरासाठी स्वर्गीय गिरीश बापट आणि मुक्ता टिळक या दोघांनीही भरपूर चांगले काम केले. पुण्यातला रखडलेला विमानतळाचा प्रश्न काही सुटत नव्हता, तेव्हा बापट यांनी या संदर्भात दिल्लीत बैठक घ्यायला लावली. त्यांच्या प्रयत्नातून लोहगाव विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्‍न कायमचा सुटला. मेट्रो आणि रिंगरोडचं कामही गतीने मार्गाला लागले आहे. हे प्रकल्प पूर्ण झाले की, पुणे शहराची वाहतूर कोंडी सुटेल," अपघाताचे प्रमाण कमी होईल.

Nitin Gadkari.
BJP Politics : दिंडोरीत शरद पवारांच्या कोंडीसाठी भाजपने 'असा' टाकला डाव
Nitin Gadkari.
Nitin Gadkari : नितीन गडकरी अंबाबाई चरणी; नेमकं काय घातलं साकडं?

"लोकसभा (Lok Sabha) निवडणूका संपल्यानंतर पुणे-संभाजीनगर मार्ग, पुणे बंगलोर महामार्ग, नाशिकफाटा ते खेड या महामार्गांच्या कामाला गती मिळणार आहे. 12 हजार कोटी रुपयांच्या पालखी महामार्ग काम आता जवळजवळ पूर्ण होत आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींची कामे झाली आहेत. तर राज्यासाठी 5 लाख कोटींपेक्षा अधिक कामे करण्यात आली आहे," असे गडकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com