Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule : 'हर्षवर्धनभाऊ मोठे नेते, ते हिताचा निर्णय घेतील, सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे भाजपपासून फारकत घेऊन वेगळी वाट निवडणार का? याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील तुतारी हातात घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) पक्षामध्ये प्रवेश करणार का? याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत सूचक वक्तव्य केला आहे.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणल्या, सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. हा अधिकार कोणतीही अदृश्य शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. मला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना परंतु बदलापूर मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी देखील आंदोलन केलं.

राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनावर निशाणा साधला आहे. बदलापूर सारख्या घटना महाविकास आघाडीच्या काळात देखील घडले आहेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीकडून हे राजकारण करण्यात येत असून त्यांचं सरकार असताना मात्र त्यांनी याबाबत कोणतीही पाऊले उचलली नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं याबाबत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, स्त्रियांसाठीचा शक्ती कायदा हा महाविकास आघाडीच्या सरकारने आणला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अशा काही घटना घडल्या तेव्हा भाजपने देखील आंदोलन केलं होतं आणि तो त्यांचा अधिकार होता. विरोधी पक्षाने आंदोलन करणं आणि सत्ताधारी पक्षाने त्याच ऐकून घेणं हे लोकशाही मध्ये महत्त्वाच आहे.

राज्यामध्ये जो जातीपातीच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. त्याला शरद पवार जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेली 25 वर्ष मी हे ऐकत आलेले आहे. लोकशाही आहे त्यांना बोलायचं अधिकार आहे. शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही त्यामुळे तेवढा तरी त्यांचा हक्क बनतो अशी खोचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

समजित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, समरजित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत कित्येक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. हर्षवर्धन भाऊ आणि आमचे पाच दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. हे कौटुंबिक संबंधात जपण्याची जबाबदारी दोन्ही बाजूची असते हर्षवर्धन भाऊ दुसरा पक्ष सोबत असले तरी त्यांनी ते संबंध जपले आहे.

भाजपच्या महाराष्ट्रातील अध्यक्षांनी केलेल्या स्टेटमेंट ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणतात की आमची युती झाली असून काही जागा आम्हाला मित्र पक्षाला सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहावं ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी जावं असं त्यांचं विधान असून ते हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीतला असल्याने फार दुर्दैवी आहे. हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांचं सहकारांमध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षांनी अशा मोठ्या नेत्याबाबत असे उद्गार काढणे अत्यंत क्लेशदायक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते तुतारी हातात घ्या असं म्हणत आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी काल इंदापूर मध्ये होते मात्र माझ्या कानावरती असं काही आलं नाही. परंतु हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते असून ते योग्य तो निर्णय घेतील जो महाराष्ट्राचा हिताचा असेल असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT