supriya sule, narendra modi
supriya sule, narendra modi sarkarnama
पुणे

Supriya Sule: '' पंतप्रधान मोदींना ग्रामपंचायत असो की संसद निवडणूक,सर्वत्र प्रचारासाठी पळावं लागतं...''

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या हस्ते यावेळी विविध विकासकामाचं लोकार्पण आणि उद्घाटन केले जाणार आहे. यामागे भाजपची मुंबई महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. यावरुन विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सुळे म्हणाल्या, पंतप्रधान मोदींना ग्रामपंचायत असो किंवा संसद निवडणूक सर्वत्र प्रचारासाठी पळावं लागतं. त्यांची ही धावपळ पाहून मला त्यांची काळजी वाटते. सध्या भाजपजवळ नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही असा चिमटाही सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी यावेळी काढला.

सुळे म्हणाल्या, राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे EDसरकार आहे. आणि या सरकारमध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. तसेच यावेळी त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बारामती दौऱ्यावर भाष्य करताना बारामतीमध्ये जो कोणी येईल त्याचं आम्ही स्वागतच करतो. आमची संस्कृती अतिथी देवो भवची आहे असं सांगितलं.

पोटनिवडणुकीवर सुळे म्हणाल्या...

तसेच कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची भूमिका मांडताना सुळे यांनी या दोन्ही जागांबाबत महविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. आमची अंतरिम चर्चा होईल. वरिष्ठ नेते भेटतील. त्यानंतर भूमिका जाहीर करण्यात येईल. पण महाविकास आघाडी कधी ही गॉसिप करत नाही.

माझ्यासाठी उध्दव ठाकरेच शिवसेना अध्यक्ष..

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे हे उत्तराधिकारी १० वर्ष होते. तुम्हाला वेगळा विचार असेल तर वेगळा पर्याय शोधा. पण माझ्यासाठी उद्धव ठाकरे हेच शिवसेना अध्यक्ष आहेत अशी स्पष्टोक्तीही सुळे यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT