Arvind Sawant News: ...म्हणून मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना खासदार सावंतांनी झापलं

Thackeray Vs Bjp News : माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधं खासदारही लिहिलं नव्हतं...
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

Arvind Sawant And BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि. १९) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदी विविध विकासकामांचं भूमिपूजन करणार आहे. यासाठी भाजप व शिंदे गटाकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. मात्र,याचदरम्यान महाविकास आघाडीसह ठाकरे गटातील नेतेमंडळींनी मोदींच्या दौऱ्यावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य केलं. सावंत म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेले आहेत. आज फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. खोटं बोला पण रेटून बोला यामध्ये माहीर असेलल्या भाजपाचा हा उपक्रम आहे.

Arvind Sawant
Congress News : सोलापुरात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे पुन्हा मैदानात उतरणार का?

तसेच राज्यशासन आणि मुंबई महापालिकेचा हा कार्यक्रम असून भाजपाचा नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते. यापत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांचं नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपाचे खासदार आहेत.

तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझं नाव नाही. काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधं खासदारही लिहिलं नव्हतं. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आलं आहे असेही अरविंद सावंत (Arvind Sawant) यावेळी म्हणाले.

Arvind Sawant
Kolhapur Politics: कोल्हापूरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांच्या कट्टर समर्थकाचा राजीनामा

सावंतांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या विविध कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांची नाव आहेत.मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार,आमदाराचं नाव नसल्यानं विरोधकांकडून भाजप व शिंदे गटावर टीका केली जात आहे. याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला जाब विचारला आहे. माजू नका काळ बदलतो. अरविद सावंत यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com